काय म्हणतात आरोग्य अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:08 AM2021-05-12T04:08:22+5:302021-05-12T04:08:22+5:30
- डॉ. प्रशांत वेखंडे प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी, नरखेड. -- तालुक्यातील लसीकरण कार्यक्रम युद्ध पातळीवर सुरू असून नागरिकही प्रतिसाद ...
- डॉ. प्रशांत वेखंडे
प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी, नरखेड.
--
तालुक्यातील लसीकरण कार्यक्रम युद्ध पातळीवर सुरू असून नागरिकही प्रतिसाद देत आहे. आरोग्य विभागाच्या वतीने तशी जनजागृती सातत्याने सुरू आहे. नागरिकांनी मास्कचा वापर नियमित करावा. गर्दीच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे.
डॉ. शशांक व्यवहारे, तालुका आरोग्य अधिकारी, काटोल
--
गावस्तरावरसुद्धा आम्ही गेलो परंतु नागरिकांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद नाही. रमजान सुरू असल्याने मुस्लिम बांधवांचे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. सोशल मीडियावरील चुकीच्या प्रचाराने लोक लसीकरणासाठी पुढे येत नाहीत. खापरखेडा आणि बडेगाव सर्कलमध्ये लसीकरणाचे प्रमाण खूपच कमी आहे.
डॉ. प्रशांत वाघ, तालुका आरोग्य अधिकारी, सावनेर.
--
तालुक्यात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र व काही ग्रामपंचायतमध्ये सुविधा पुरवण्यात आल्या. १८ वर्षावरील वयोगटाचे कन्हान येथे लसीकरण सुरू आहे. इतर ठिकाणी लसीकरणासंदर्भात अद्याप आदेश नाहीत.
-डॉ. तारिक अन्सारी
कोविड प्रभारी, आरोग्य अधिकारी
--
ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात असताना लसीकरण मात्र कमी होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील सर्व अधिकारी घरोघरी जाऊन लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पण पाहिजे तसे यश मिळत नाही. मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये. कोरोना रोखण्यासाठी लसीकरण हाच उपाय आहे.
डॉ. चेतन नाईकवार, तालुका आरोग्य अधिकारी, रामटेक
--
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मौदा तालुक्याला मोठा फटका बसला. याच काळामध्ये तालुक्यात लसीकरणाची टक्केवारीसुद्धा वाढली. मात्र लसीकरणामुळे मृत्यू होत आहेत, असा गैरसमज पसरविण्यात आला. त्यामुळे लोकांनी कोणतीही भीती न बाळगता लसीकरणासाठी पुढे येणे गरजेचे आहे.
- डॉ. रूपेश नारनवरे, तालुका आरोग्य अधिकारी, मौदा
----
कुही येथील ग्रामीण रुग्णालय तसेच तालुक्यातील मांढळ, वेलतूर, साळवा व तितूर या चार प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू आहे. कोरोनावर मात करायची असेल तर लसीकरण हाच उपाय आहे. तेव्हा नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता लसीकरण करावे.
डॉ. राजेश गिलानी, तालुका आरोग्य अधिकारी, कुही
--
१८ ते ४४ वयोगटात लसीकरणासंदर्भात अद्याप कुठल्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. या वयोगटातील फ्रंटलाईन वर्कर म्हणून केवळ १२ जणांचे लसीकरण झाले आहे. तालुक्यात आतापर्यंत १९,५०४ जणांचे लसीकरण झालेले आहे. लस सुरक्षित आहे.
- डॉ. केवल कोरडे, तालुका आरोग्य अधिकारी भिवापूर (प्रभारी)