"हा कसला राजा हा तर भिकारी"; चंद्रशेखर बावनकुळे यांची जोरदार टीका
By योगेश पांडे | Published: March 6, 2024 05:21 PM2024-03-06T17:21:31+5:302024-03-06T17:23:42+5:30
द्रमुक पक्षाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांनी भारत हे एक राष्ट नाही याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे.
नागपूर : द्रमुक पक्षाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांनी भारत हे एक राष्ट नाही याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे. राजा यांचे विचार त्यांच्या नावाप्रमाणे नाहीत. हा कसला राजा हा तर भिकारी, या शब्दात त्यांनी हल्लाबोल केला. त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आपली भावना व्यक्त केली.
भारत हे एक राष्ट्र नाही हे बोलणे म्हणजे भारतविरोधी भूमिका आहे. ए. राजा यांचे विधान म्हणजे राजाला लागलेले भिकेचे डोहाळे आहेत. हा भारतीय सभ्यता, परंपरा व आस्थेचा अपमान आहे. इंडी आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार सनातन धर्माचा अपमान होत आहे. जाणुनबुजून हा प्रकार केला जात असल्याचा आरोप त्यांनी लावला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील इंडी आघाडीचे घटक आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान त्यांनी सहन केला. आता भारतमाता, भगवान श्रीराम, रामायणाचा अपमान त्यांचे मित्रपक्ष करत आहेत. उद्धव ठाकरेंची भूमिका पाहून कीव येते, असा चिमटा बावनकुळे यांनी काढला.