रस्ते अपघातांत नेमके बळी किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 01:41 AM2017-09-11T01:41:12+5:302017-09-11T01:41:27+5:30

उपराजधानीतील रस्ते अपघातांमध्ये नेमके किती बळी गेले याबाबत प्रशासकीय पातळीवरच संभ्रम असल्याची बाब समोर आली आहे.

What is the real nature of road accident? | रस्ते अपघातांत नेमके बळी किती?

रस्ते अपघातांत नेमके बळी किती?

Next
ठळक मुद्देमंत्रालय आणि वाहतूक शाखेच्या माहितीत तफावत : मृत्यूच्या आकडेवारीबाबत प्रशासकीय गोंधळ योगेश पांडे।

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील रस्ते अपघातांमध्ये नेमके किती बळी गेले याबाबत प्रशासकीय पातळीवरच संभ्रम असल्याची बाब समोर आली आहे. एकीकडे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे २०१६ साली नागपुरातील अपघातांमध्ये ३०७ बळी गेल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र नागपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेने माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीत हाच आकडा ३१० इतका आहे. मृतांच्या आकडेवारीत केवळ तीनचा फरक असला तरी यातून प्रशासकीय गोंधळ निश्चितच समोर आला आहे.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने देशपातळीवर झालेल्या अपघातांचा अहवाल जारी करण्यात आला आहे. या अहवालात १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ५० शहरांतील आकडेवारीदेखील आहे. २०१६ साली नागपुरात १ हजार ३७३ अपघात झाले व यात ३०७ बळी गेले असे नमूद आहे. मात्र नागपूर पोलिसांच्या वाहतूक विभागाची आकडेवारी वेगळेच आकडे देत आहे.
‘लोकमत’कडे २२ एप्रिल २०१७ रोजी माहितीच्या अधिकारात वाहतूक विभागाने दिलेली रस्त्यांची आकडेवारी आहे. या आकडेवारीनुसार शहरात २०१६ मध्ये रस्ते अपघातांमध्ये ३१० नागरिकांचा मृत्यू झाला होता असे स्पष्ट करण्यात आले आहे. मंत्रालय आणि वाहतूक शाखेच्या आकडेवारीत तीन मृत्यूंचा फरक आहे. मंत्रालयाला ही माहिती शहर प्रशासनाकडूनच पुरविण्यात आली असेल. बळींच्या फरकाचा आकडा मोठा नसला तरी प्रशासकीय पातळीवर ही बाब गंभीरतेने घेतली जाणारी निश्चितच आहे. शिवाय मृतांचा आकडा नेमका किती असा संभ्रमदेखील निर्माण झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे खुद्द नागपूरचे असतानादेखील त्यांच्या शहरातील आकडेवारीबाबत इतकी तफावत असेल तर बाकी शहरांत काय स्थिती असेल असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.

Web Title: What is the real nature of road accident?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.