विजयादशमी विशेष; अर्थव्यवस्था व केंद्राच्या कामगिरीवर सरसंघचालक काय भूमिका मांडणार ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 07:31 PM2021-10-14T19:31:23+5:302021-10-14T19:32:54+5:30

Nagpur News कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्याचे आयोजन मर्यादित उपस्थितीत होणार आहे. असे असले तरी सोहळ्याबाबत स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

What role will Sarsanghchalak play on the economy and the performance of the Center? | विजयादशमी विशेष; अर्थव्यवस्था व केंद्राच्या कामगिरीवर सरसंघचालक काय भूमिका मांडणार ? 

विजयादशमी विशेष; अर्थव्यवस्था व केंद्राच्या कामगिरीवर सरसंघचालक काय भूमिका मांडणार ? 

Next
ठळक मुद्देस्वयंसेवकांमध्ये उत्साह, ऑनलाईन-ऑफलाईन एकत्रीकरण

 

नागपूर : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्याचे आयोजन मर्यादित उपस्थितीत होणार आहे. असे असले तरी सोहळ्याबाबत स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. गुरुवारी रेशीम बाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील. महागाई, इंधन दरवाढ, शेतकरी आंदोलन, चीनसोबत सुरू असलेला तणाव इत्यादी मुद्द्यांवरुन राजकारण तापले असताना सरसंघचालक एकूण परिस्थितीबाबत काय भूमिका मांडतात याकडे राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (What role will Sarsanghchalak play on the economy and the performance of the Center?)

पुढील वर्षी उत्तरप्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. मागील वर्षभरातील बहुतांश काळ कोरोनाशी लढ्यात गेला आहे. शिवाय विविध मुद्द्यांवरून विरोधक व सत्ताधारी यांच्यातील राजकारण तापले आहे. अशा स्थितीत केंद्राचे आर्थिक धोरण, केंद्र शासनाची कामगिरी, सामाजिक समरसता, आरक्षणाचा मुद्दा, कृषी व ग्रामविकास, दुर्गम क्षेत्रांचे मागासलेपण, संघ-शासन-समाजाचा समन्वय, पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचार, तालिबानमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेली अस्वस्थता, कुटुंब प्रबोधन व कोरोना महामारीनंतरची आव्हाने इत्यादी संदर्भात डॉ. भागवत मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.

‘ट्वीटर’, ‘ फेसबुक ’ वर ‘ लाईव्ह ’

देशात सत्ताबदल झाल्यानंतरचा हा आठवा विजयादशमीचा उत्सव राहणार आहे. संघाचा वाढता दबदबा व शाखांचा विस्तार यामुळे यंदा देखील यासंदर्भात स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. जास्तीत जास्त नागरिक ऑनलाईन माध्यमातून सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या सोहळ्याचे ‘ वेब कास्टिंग ’ करण्यात येणार आहे. ‘ फेसबुक ’ सह, ट्वीटर, युट्यूब या माध्यमातून देखील संघाचा कार्यक्रम जगभरात ‘ लाईव्ह ’ होणार आहे.

निवडक स्वयंसेवकांना प्रवेश

कोरोनामुळे प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी निवडक स्वयंसेवकांना प्रवेश देण्यात येणार आहे. सोबतच विविध धर्मगुरु व पंथ समुदायांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे. काही व्हीव्हीआयपी स्वयंसेवक देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

नगरपातळीवर नियोजन

शहरातील ४० नगरांमधील विविध मैदानांवर स्वयंसेवकांचे एकत्रीकरण होणार आहे. त्याठिकाणी कोरोनाच्या प्रोटोकॉलचे पालन व्हावे अशी सूचना महानगर पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. बहुतांश ठिकाणी मोठमोठ्या स्क्रिन लावून एकत्रितपणे सरसंघचालकांचे उद्बोधन पाहण्यात येणार आहे. नागपूर शिवाय देशातील इतर भागात देखील अशाच प्रकारचे एकत्रीकरण राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुरुवारी सायंकाळी सर्वच ठिकाणी पदाधिकारी तयारीमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले.

Web Title: What role will Sarsanghchalak play on the economy and the performance of the Center?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.