‘महिला राज’चा उपयोग काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 01:17 AM2017-11-13T01:17:28+5:302017-11-13T01:17:43+5:30
जिल्हा परिषदेची मिनी मंत्रालय म्हणून ओळख आहे. ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातून लोक जि.प.मध्ये आपल्या कामासाठी येतात. खेड्यापाड्यातून शहरात येणाºया महिलांना त्रास होऊ नये, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेची मिनी मंत्रालय म्हणून ओळख आहे. ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातून लोक जि.प.मध्ये आपल्या कामासाठी येतात. खेड्यापाड्यातून शहरात येणाºया महिलांना त्रास होऊ नये, कामकाज होर्ईपर्यंत त्यांना निवांत बसता यावे यासाठी जि.प.ने त्यांना हक्काचे कक्ष उपलब्ध करून दिले होते. परंतु हे प्रतिक्षालय गेल्या कित्येक वर्षापासून कुणी उघडलेले बघितलेच नाही. विशेष म्हणजे जि.प.मध्ये अध्यक्षापासून सीईओंपर्यंत सात महिलांचे वर्चस्व असतानाही, या महिलाराजमध्ये सुद्धा महिलांना प्रतिक्षालय उघडण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
शुक्रवारी काही महिला जि.प.मध्ये कामकाजासाठी आल्या होत्या. बसायला इतरत्र जागा नसल्याने जुन्या इमारतीला लागून असलेल्या आबासाहेब खेडकर सभागृहाच्या पायºयांवरच बसल्या होत्या. या पायºयांच्याच अगदी समोर महिला प्रतिक्षालयाची पाटी लावलेली काही महिलांना दिसली. यातील एका महिलेने उत्सुकतेपोटी जाऊन बघितल्यावर प्रतिक्षालयाला कुलूपासह तारांनी बांधलेले होते. हे बघून कुरबूर न करता, ती महिला मुकाट्याने पायरीवर येऊन बसली. उत्सुकतेपोटी लोकमत प्रतिनिधीने कक्षाच्या बाजूलाच असलेल्या आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या शिपायाला विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या नोकरीत हे कक्ष कधीच उघडले गेलेच नाही. याच परिसरात गेल्या १५ ते १६ वर्षापासून राहणाºया, जि.प.च्या कानाकोपºयाची माहिती असणाºया व्यक्तीलाही विचारले तर त्याने सांगितले की, या कक्षाचा गोदाम म्हणून उपयोग केला जातो. प्रतिक्षालयाच्या संदर्भात काही कर्मचाºयांनाही विचारणा केली, परंतु त्यांनाही कल्पना नव्हती. परंतु त्या कक्षापुढे महिला प्रतिक्षालयाची पाटी लिहिली असल्याने, बाहेरगावाहून येणाºया महिलांसाठी येथे बसण्याची व्यवस्था असेल, असेच यावरून दिसते.
महिलांच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष योग्य नाही
जि.प.मध्ये सीईओ, अतिरिक्त सीईओ, समाजकल्याण अधिकारी, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता या महिला आहेत. तर अध्यक्ष, महिला व बालकल्याण सभापती, कृषी सभापती या महिला आहेत. अधिकारी आणि पदाधिकाºयांमध्ये महिलांचे वर्चस्व जास्त आहे. असे असतानाही महिलांच्या सुविधेकडे दुर्लक्ष होत असेल, तर योग्य नाही.
विरोधी पक्षाचाही स्वतंत्र कक्ष नाही
५८ सदस्यांच्या जिल्हा परिषदेत २० च्यावर विरोधी पक्षाचे सदस्य आहेत. विरोधी पक्षाच्या सदस्यांनाही स्वतंत्र बसण्याला कक्ष नाही. विरोधी पक्षाचे सदस्य दरवेळी कुठल्यातरी सभापतीच्या कक्षात, कधी अध्यक्षाच्या कक्षात बसलेले दिसतात.