सोयाबीन, मोसंबीची नुकसानभरपाई कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:13 AM2021-02-17T04:13:55+5:302021-02-17T04:13:55+5:30
काटोल : काटोल-नरखेड तालुक्यातील गतवर्षी खरीप हंगामातील मोसंबी फळपीक तसेच सोयाबीन पीक अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात भुईसपाट झाले. या नुकसानीची ...
काटोल : काटोल-नरखेड तालुक्यातील गतवर्षी खरीप हंगामातील मोसंबी फळपीक तसेच सोयाबीन पीक अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात भुईसपाट झाले. या नुकसानीची पाहणी प्रधान कृषी सचिवांनी केली होती. याबाबतचा अहवालही पोलिसांनी सादर केला होता. मात्र अद्यापही तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. खरीपातील अतिवृष्टीमुळे नष्ट झालेल्या मोसंबी व सोयाबीन पिकाची नुकसानभरपाई कधी, असा प्रश्न विचारात काटोलचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांना माजी आमदार आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. ही नुकसानभरपाई दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. पंचायत समिती सभापती धम्मपाल खोब्रागडे, नरखेड कृषी बाजार समितीचे सभापती बबनराव लोहे, निशिकांत नागमोते, दिनकर राऊत, मनोज जवंजाळ, दिलीप तिजारे, मोहन पांडे, कृष्णा दफरे व दोन्ही तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.