कोरोनाचा धोका टळलेला नसताना नर्सरी स्कूलमध्ये भरवला १२० मुलांचा वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 09:32 PM2021-09-14T21:32:18+5:302021-09-14T21:32:47+5:30
Nagpur News कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नसतानाही लहान मुलांचा जीव धोक्यात टाकून १२० मुलांचा वर्ग भरवणाऱ्या अंब्रेला नर्सरी स्कूलला मंगळवारी मनपाच्या उपद्रव शोध पथकाने (एनडीएस)१५ हजाराचा दंड ठोठावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. असे असतानाही लहान मुलांचा जीव धोक्यात टाकून १२० मुलांचा वर्ग भरवणाऱ्या अंब्रेला नर्सरी स्कूलला मंगळवारी मनपाच्या उपद्रव शोध पथकाने (एनडीएस)१५ हजाराचा दंड ठोठावला. (When the danger of corona was not averted, a class of 120 children was filled in the nursery school)
संक्रमणाचा धोका विचारात घेता नागपूर शहरातील शाळा, महाविद्याले सुरू करण्याला परवानगी दिलेली नाही. असे असूनही पालकांकडून पैसै वसूल करण्यासाठी शहरातील कामठी मार्गावरील कडबी चौक येथील अंब्रेला नर्सरी स्कूल मधील वर्ग सुरू होते. याची माहिती मिळताच एनडीएस पथकाने तपासणी केली असता तब्बल १२० मुले वर्गात उपस्थित असल्याचे आढळून आले. नर्सरी स्कूलच्या दीपिका एस.बेरी यांना १५ हजारांचा दंड केला.
लहान मुलांना कोविड नियमांचे पालन करणे शक्य नाही. याचा विचार करता मार्च २०२० पासून नर्सरी स्कूल पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. पहिली लाट ओसरल्यानंतर इयत्ता ५ वी ते १२ पर्यंतचे वर्ग काही दिवस सुरू होते. परंतु त्यानंतर संक्रमण वाढताच वर्ग बंद करण्यात आले.
दुसरीकडे पैशासाठी लहान मुलांचा जीव धोक्यात घालून कडबी चौक येथील नर्सरीत वर्ग सुरू करण्यात आले. यापुढे वर्ग सुरू ठेवल्यास कठोर कारवाई केली जाईल. असा इशारा एनडीएस पथकाने संचालकांना दिला.
दरम्यान हनुमाननगर झोन क्षेत्रातील नंदनवन येथील एमआर कोचिंग क्लासेसचे मिलिंद राऊत यांना ५ हजार रुपये दंड करण्यात आला. मंगळवारी झोन क्षेत्रातील जरीपटका येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायर अॅन्ड सेफ्टी यांच्यावर ५ हजाराचा दंड आकारण्यात आला.