जेव्हा गडकरी स्वत: कारमधून उतरून वाहतूक व्यवस्था सांभाळतात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:06 AM2021-06-19T04:06:42+5:302021-06-19T04:06:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पारडी उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे भंडारा रोडवर वाहतूक व्यवस्था बिघडलेली आहे. येथे नेहमीच वाहतूक जाम होत ...

When Gadkari gets out of the car himself and manages the traffic () | जेव्हा गडकरी स्वत: कारमधून उतरून वाहतूक व्यवस्था सांभाळतात ()

जेव्हा गडकरी स्वत: कारमधून उतरून वाहतूक व्यवस्था सांभाळतात ()

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पारडी उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे भंडारा रोडवर वाहतूक व्यवस्था बिघडलेली आहे. येथे नेहमीच वाहतूक जाम होत असते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना स्वत: शुक्रवारी या समस्येचा सामना करावा लागला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गडकरी कारमधून उतरले आणि स्वत: वाहतूक व्यवस्था सांभाळू लागले. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजताची वेळ होती. भवानी मंदिर येथे ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण करण्यासाठी गडकरी पारडीला जात होते. त्यांचा ताफा जेव्हा पारडी उड्डाणपुलाजवळ पोहोचला तेव्हा तेथील वाहतूक व्यवस्था अगदीच बिघडलेली होती. गडकरी तातडीने कारमधून उतरले आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मदत करू लागले. गडकरी यांना पाहून परिसरातील लोकही जमले. यावेळी गडकरी यांनी रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांचाही ‘क्लास’ घेतला. अतिक्रमणामुळे लोकांना वाहतुकीला कसा त्रास होतोय, हे समजावून सांगितले.

यानंतर लोकांना समस्या सोडविण्याचे आश्वासन देऊन ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. गडकरी यांना यावेळी पारडी उड्डाणपुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

Web Title: When Gadkari gets out of the car himself and manages the traffic ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.