टँकरमधून गॅस लिकेज होतो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:41 AM2017-10-13T01:41:13+5:302017-10-13T01:41:47+5:30

एचपीसीएल कंपनीच्या एका मोठ्या टँकरमधून अचानक गॅस लिकेज झाले. पाहता-पाहता या लिकेजने मोठे रूप धारण करायला सुरू केले.

When the gas leakage from the tanker ... | टँकरमधून गॅस लिकेज होतो तेव्हा...

टँकरमधून गॅस लिकेज होतो तेव्हा...

googlenewsNext
ठळक मुद्देवर्धा रोडवर मॉक ड्रील : २४ मिनिटात परिस्थिती नियंत्रणात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एचपीसीएल कंपनीच्या एका मोठ्या टँकरमधून अचानक गॅस लिकेज झाले. पाहता-पाहता या लिकेजने मोठे रूप धारण करायला सुरू केले. परंतु ड्रायव्हरची समयसूचकता आणि गॅस कंपनीसह, अग्निशमन दल, महापालिका, पोलीस, वाहतूक विभाग, जिल्हा प्रशासन अणि नागरिकांच्या एकूणच समन्वय व सहकार्यातून अवघ्या २४ मिनिटात परिस्थिती नियंत्रणात आणता आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही मॉकड्रील बुधवारी दुपारी खापरीजवळ वर्धा रोडवर करण्यात आली. बुधवारी दुपारी १२.४० वाजता एचपीसीएल कंपनीचा भला मोठा गॅस टँकर घेऊन ड्रायव्हर निघाला. टँकरमध्ये गॅस भरला होता. थोड्या अंतरावर जाताच गॅस गळती होत असल्याचे ड्रायव्हरच्या निदर्शनास आले. ही गॅस गळती वाढल्यास स्फोट होऊन मोठा अनर्थ घडण्याची शक्यता असते. तसेच गॅसमुळेसुद्धा नुकसान होऊ शकते. ड्रायव्हरने धोका लक्षात घेऊन लगेच कंपनीच्या अधिकाºयांना फोन केला. त्यांनी तातडीने पावले उचलून कंपनीच्या सुरक्षा विभाग आणि महापालिकेच्या अग्निशमन विभागाला तसेच जिल्हा प्रशासनाला तातडीने सूचना केली. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे हे स्वत: घटनास्थळी पोहोचले. मनपाच्या सिव्हिल लाईन्समधील मुख्यालयातून अग्निशमन विभागाची एक गाडी निघाली. सोबतच नरेंद्रनगर व एमआयडीसी येथील अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळाकडे रवाना झाली. वाहतूक पोलिसांनी संपूर्ण वाहतूक वळती केली. संपूर्ण परिसर सुरक्षा अधिकाºयांनी आपल्या ताब्यात घेतला. परिसरातील नागरिकांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. गॅस कंपनीच्या अधिकाºयांच्या नेतृत्वात कुलींग करण्यात आले. जवळपासची वाहने हटविण्यात आली. प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी इतक्या सफाईने केली, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या नेतृत्वातील हे आॅपरेशन अवघ्या २४ मिनिटात पार पडले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळविता आले. घटनेत एक वाहनचालक किरकोळ जखमी झाला. प्रथमोपचारानेच तो बरा झाला. या घटनेमुळे काही वेळासाठी नागरिक हादरून गेले होते. परंतु काही वेळानंतर ही मॉक ड्रील असल्याचे समजल्यावर सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
जागतिक आपत्ती निवारण आठवडा
जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण केंद्रातर्फे जागतिक आपत्ती निवारण आठवडा सुरू आहे. या अंतर्गत विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. वर्धा रोडवरील मॉक ड्रिलसुद्धा याचाच एक भाग होता.

Web Title: When the gas leakage from the tanker ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.