... जाग आली तेव्हा तो होता मायानगरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 10:41 AM2018-06-25T10:41:17+5:302018-06-25T10:44:19+5:30

मैहरला दर्शनासाठी गेलेला एक तरुण नागपूरला परतण्यासाठी ट्रेनमध्ये बसला आणि झोपी गेला. जाग आली तेव्हा ट्रेन मुंबईला थांबली होती. झोपेमुळे आयुष्याचा ट्रॅकच बदलून गेलेला हा तरुण म्हणजे नंदू देवगडे.

... when he was awake he was in Bollywood city | ... जाग आली तेव्हा तो होता मायानगरीत

... जाग आली तेव्हा तो होता मायानगरीत

Next
ठळक मुद्देफिल्मी दुनियेत संघर्ष करणाऱ्या नंदूचा प्रवासअनेक चित्रपट, मालिकांमध्ये केले काम

निशांत वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मैहरला दर्शनासाठी गेलेला एक तरुण नागपूरला परतण्यासाठी ट्रेनमध्ये बसला आणि झोपी गेला. जाग आली तेव्हा ट्रेन मुंबईला थांबली होती. या मायानगरीत कुणाचा आसरा नाही, खिशात पैसा नाही, अशा अवस्थेत त्याच्या जगण्याची धडपड सुरू झाली. मात्र हा कदाचित मातेने दिलेला मायानगरीचा संकेत असेल, असा विचार करून त्याने फिल्मी दुनियेतील संघर्षाला सुरुवात केली. झोपणे हे बहुतेकांना आळसाचे लक्षण वाटत असले तरी झोपेमुळे आयुष्याचा ट्रॅकच बदलून गेलेला हा तरुण म्हणजे नंदू देवगडे.
मायानगरीच्या संघर्षात त्याला बऱ्यापैकी यश मिळत असून तो आता मुंबईमध्ये स्थिर होऊ पाहत आहे. गेल्या दोन-तीन वर्षात त्याने ५ चित्रपट व १७ टीव्ही मालिकांमध्ये लहान मोठ्या चरित्र भूमिका केल्या आहेत. यामध्ये लापतागंज, चिडीयाघर, सावधान इंडिया, तारक मेहता... आदींचा समावेश आहे. कंगना, रेड सिग्नल, फ्रेन्ड रिक्वेस्ट आदी काही चित्रपटांमधूनही त्याने भूमिका साकारल्या आहेत. मात्र इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. नंदूच्याच शब्दात, गावखेड्यात राहणाऱ्या अभावग्रस्त जीवन जगणाऱ्यांचे मुंबईला पोहचणे कठीणच आणि पोहचलाच तर बॉलिवूडमध्ये काम मिळणे अशक्य. नंदू देवगडे हा मूळचा मध्य प्रदेशातील. अतिशय गरीब कुटुंबातील नंदू आपले शालेय शिक्षणही पूर्ण करू शकला नव्हता. रोजगाराच्या शोधात तो नागपूरला आला. एका फर्निचरच्या दुकानात काम मिळविले.
धार्मिक वृत्तीचा नंदू एकदा मैहर येथे शारदा मंदिरात दर्शनासाठी गेला होता. परतीच्या प्रवासात झोप लागल्याने नागपूर ऐवजी तो मुंबईला पोहचला. हा कदाचित देवीचा संकेत असेल, असे मानून त्याने मायानगरीत हातपाय मारणे सुरू केले. जवळचा पैसाअडका संपलेला असताना तो अनेक दिवस उपाशी राहिला. अनेक अभिनेत्यांच्या बंगल्यासमोर रात्र घालविल्या. या संघर्षात त्याला एका व्यक्तीच्या मदतीने ईस्कॉन मंदिरात काम मिळाले. याचदरम्यान त्याने मार्शल आर्ट, जिम्नॅस्टीक व अभिनयाचे क्लासही केले.
येथीलच ओळखीतून त्याना एका मालिकेत काम मिळाले आणि मिळत गेले. १७ सिरियल्स व ५ चित्रपटांमध्ये लहान मोठ्या भूमिका त्याने साकारल्या आहेत व आणखी काही चित्रपट येणार आहेत. त्याचा संघर्ष संपला नाही, पण मायानगरीत तग धरण्याचा आत्मविश्वास मात्र मिळाला आहे.

Web Title: ... when he was awake he was in Bollywood city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.