गृहमंत्र्यांची स्कुटर अनबॅलेन्स होते तेव्हा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:26 AM2020-12-13T04:26:30+5:302020-12-13T04:26:30+5:30
नागपूर - शहर पोलीस दलात दाखल झालेल्या सेल्फ बॅलेन्सिंग स्कुटरचा गृहमंत्री ताबा घेतात अन् पुढच्या काही क्षणातच सेल्फ बॅलेन्सिंग ...
नागपूर - शहर पोलीस दलात दाखल झालेल्या सेल्फ बॅलेन्सिंग स्कुटरचा गृहमंत्री ताबा घेतात अन् पुढच्या काही क्षणातच सेल्फ बॅलेन्सिंग स्कूटर अनबॅलेन्स होते. परिणामी काही क्षणासाठी पोलिसांची चांगलीच भंबेरी उडते. पोलीस जिमखान्यात आयोजित एका कार्यक्रमात घडलेल्या या प्रकाराचा व्हीडीओ नंतर व्हायरल झाला अन् जागोजागी चर्चेचा विषय ठरला.
राज्य पोलीस दलाकडून नागपूर पोलिसांना १० सेल्फ बॅलेन्स टू व्हील स्कुटर देण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून गस्त घालण्यासाठी या स्कूटरचा वापर केला जाणार आहे. त्या प्रत्यक्ष सेवेत रुजू करून घेण्याचा सोहळा शनिवारी रात्री ७ वाजता पोलीस जिमखान्यात पार पडला. या सोहळ्याला मुख्य अतिथी गृहमंत्री अनिल देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते. स्कुटरचा बॅलेन्स दाखवत पोलीस अधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांना सलामी दिली. अतिशय आकर्षक दिसणाऱ्या या स्कुटरची ट्रायल घेण्याचा मोह गृहमंत्र्यांना आवरला नाही. त्यांनी लगेच एक स्कुटर ट्रायलसाठी हातात घेतली. स्कुटरचा ताबा घेताच ती अनबॅलन्स झाली. परिणामी स्कुटरसोबत गृहमंत्रीही हलू लागले. ते पाहून पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. एकसाथ अनेक जण धावले अन् स्कुटरला आधार दिला. गृहमंत्री खाली उतरले तेव्हा कुठे पोलिसांचा जीव भांड्यात पडला.
----