स्वच्छता कर्मचाऱ्यांना न्याय कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:24 AM2021-02-20T04:24:11+5:302021-02-20T04:24:11+5:30
उमरेड : अखिल भारतीय स्वच्छता कामगार काँग्रेसच्या वतीने स्वच्छता कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांची कैफीयत मांडत निवेदन देण्यात ...
उमरेड : अखिल भारतीय स्वच्छता कामगार काँग्रेसच्या वतीने स्वच्छता कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांची कैफीयत मांडत निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचे सदर निवेदन नगर पालिकेच्या मुख्याधिकारी सुवर्णा दखणे यांना सोपविण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास १ मार्चपासून ढोल बजाओ, भीक मांगो आंदोलनाचा इशारा सुद्धा निवेदनात देण्यात आला आहे. शासनाकडून महिन्याच्या १ तारखेला कर्मचाऱ्यांच्या वेतन अनुदानाची रक्कम देण्यात यावी. स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी नि:शुल्क निवासस्थाने तयार करण्यात यावीत. कंत्राट पद्धती बंद करावी. नगर पालिकेचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. असे असतानाही दुसरीकडे आरोग्य कर्मचाºयांची संख्या मात्र घटत आहे. तातडीने आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे सरकारला करण्यात आली आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात दिनेश तांबेकर, सुधीर सांडेकर,धनराज तांबेकर, सुनील तांबेकर,राजेश तांबेकर, सोनू सांडेकर, दिनेश खोटे आदींचा समावेश होता.