प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयात मसन्याउद शिरतो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:42 PM2020-05-19T23:42:27+5:302020-05-19T23:45:22+5:30

प्रधान मुख्य संरक्षकांच्या कार्यालयात मंगळवारी वेगळाच अनुभव आला. चक्क मसन्या उद हा प्राणी त्यांच्या कार्यालयातील तिसऱ्या माळ्यावर शिरला. अखेर त्याला पकडून सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे काही काळ वनभवनमध्ये एकच खळबळ उडाली.

When Masanyaud enters the office of the Chief Forest Officer ... | प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयात मसन्याउद शिरतो तेव्हा...

प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयात मसन्याउद शिरतो तेव्हा...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रधान मुख्य संरक्षकांच्या कार्यालयात मंगळवारी वेगळाच अनुभव आला. चक्क मसन्या उद हा प्राणी त्यांच्या कार्यालयातील तिसऱ्या माळ्यावर शिरला. अखेर त्याला पकडून सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे काही काळ वनभवनमध्ये एकच खळबळ उडाली. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांचे कार्यालय येथे आहे. वनभवनच्या तिसऱ्या माळ्यावर मसन्या उद हा प्राणी शिरल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांना मिळाली. यावरून ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील वनरक्षक दिनेश बोरकर, समीर नेवारे, शुभम खोरगडे आणि कमलेश गेडाम यांचे पथक सर्व साहित्यनिशी रवाना झाले. वनभवन मधील तिसº­या माळ्यावर असलेल्या स्टोरेजच्या आलमरीखाली तो दडून बसला होता. जागा फार कमी त्यामुळे त्याला काढणे कठीण होऊन बसले होते. त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी बेशुद्ध करणे हाच पर्याय होता. बराच वेळ प्रयत्न केल्यावर या प्राण्याची शेपटी हातात आली. डॉ. बिलाल यांनी त्याला बेशुद्धीकरणाचे इंजेक्शन दिले, थोड्या वेळात तो बेशुद्ध झाल्यावर बाहेर काढण्यात आले.

Web Title: When Masanyaud enters the office of the Chief Forest Officer ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.