वर्धा मार्गावरील वाहतूक कोंडी कधी सुटणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 11:19 PM2018-11-06T23:19:11+5:302018-11-06T23:20:38+5:30

नागरिकांचा विकास कामांना विरोध नाही. परंतु वर्षभरापासून वर्धा मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. यातून वाहनचालकांची सुटका होण्याची चिन्हे दिसत नाही. मेट्रोद्वारे तयार करण्यात येत असलेल्या डबल डेकर उड्डाणपुलाचे गर्डर टाकणे सुरू असल्याने रात्रीच्या वेळी छत्रपती चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान एकेरी वाहतूक बंद करण्यात येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

When traffic dilemma will solve on Wardha road ? | वर्धा मार्गावरील वाहतूक कोंडी कधी सुटणार ?

वर्धा मार्गावरील वाहतूक कोंडी कधी सुटणार ?

Next
ठळक मुद्देनागरिक त्रस्त : रात्रीला एकेरी वाहतुकीमुळे फेरा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागरिकांचा विकास कामांना विरोध नाही. परंतु वर्षभरापासून वर्धा मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. यातून वाहनचालकांची सुटका होण्याची चिन्हे दिसत नाही. मेट्रोद्वारे तयार करण्यात येत असलेल्या डबल डेकर उड्डाणपुलाचे गर्डर टाकणे सुरू असल्याने रात्रीच्या वेळी छत्रपती चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान एकेरी वाहतूक बंद करण्यात येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
या मार्गावरील मेट्रो रेल्वे काम अंतिम टप्प्यात आहे. साईमंदिर ते विमानतळादरम्यान उड्डाणपुलावर दोन्ही बाजूने गर्डर टाकण्यात येत आहे. त्यामुळे छत्रपती चौक ते विमानतळापर्यंतच्या रस्त्यावरील एकेरी वाहतूक रात्री बंद करण्यात येते. वर्धा मार्गावरील वाहनांसाठी आता खामला ते सहकारनगर स्मशानघाटाजवळून विमानतळ परिसराच्या आतून पयांयी रस्ता दुरुस्त करून त्या ठिकाणाहून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे घाटापासून थेट विमानतळाच्या प्रवेशद्वारावर रस्ता निघतो. मात्र, विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा रस्ता रात्री १० वाजेनंतर बंद करण्यात येतो. त्यामुळे वाहनांना वर्धा मार्गाशिवाय पर्याय राहात नाही. पण, रात्री या मार्गावर काम सुरू असल्याने कर्मचारी वाहतूक रोखून धरतात.
यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो. तीन वर्षांपासून शहरात मेट्रो, सिमेंट रस्ते आणि उड्डाण पूल तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक मार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे.
रात्रीला अनेकजण अजनी चौकापासून खामला चौक, खामला बाजारकडून पर्यायी रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करतात, पण रात्री रस्त्याचे प्रवेशद्वार विमानतळ सुरक्षा व्यवस्थेकडून बंद करण्यात येते. त्यामुळे अनेकांना परत छत्रपती चौकात यावे लागते. अन्यथा जयप्रकाशनगरच्या आतून उज्ज्वलनगर परिसरातून वर्धा मार्गावर यावे लागते. तर वर्धेकडून नागपूरच्या दिशेने येणारी अनेक वाहने रात्री विमानतळाच्या प्रवेशद्वाराने खामला बाजारकडे येण्याचा प्रयत्न करतात. पण, सहकारनगर घाटाजवळील प्रवेशद्वार बंद राहते व त्यांना पुन्हा यू-टर्न घेऊन तीन किमी मागे जावे लागते.

सीताबडीतही अशीच स्थिती
सीताबर्डी परिसरातही मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. महाराष्ट्र बँक चौकात चारही बाजूने खोदकाम व बांधकाम सुरू आहे. मेट्रो इमारतीच्या पिल्लरच्या खालून वाहतूक सुरू असून त्या ठिकाणी दिवसाही मोठा अंधार असतो. सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्याची गरज आहे. तसेच मेट्रो पिल्लरमुळे झाशी राणी चौकात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. सदर व भागातही सायंकाळी व सकाळच्या सुमारास वाहतूक कोंडी निर्माण होते.

 

Web Title: When traffic dilemma will solve on Wardha road ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.