जेव्हा किन्नरांच्या रुपात प्रत्यक्ष अन्नपूर्णा अवतरते...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2022 08:00 AM2022-06-16T08:00:00+5:302022-06-16T08:00:06+5:30
Nagpur News राज्यात प्रथमच आयोजित केलेल्या किन्नर पाककृती स्पधेत नागपूरच्या मोहिनी व सोनू या जोडीने दुसरा क्रमांक पटकावला आहे.
नागपूर: जे हात दिवसभर भटकत टाळ्या वाजवून आपली उपजिवीका करतात, त्या हातांमधून जेव्हा प्रत्यक्ष अन्नपूर्णा अवतरते तेव्हा, त्याचा झालेला आनंद हा काही औरच असतो. हे अगदी नेमकेपणाने म्हणजे, मोहिनीच्या शब्दात सांगायचं झालं तर, " पिछले साल मुझे मिस ट्रान्स ब्युटी २०२१ यह पुरस्कार मिला था.. मगर आज खाना बनाकर जो आनंद मिला और उस खाने को सराहा गया, उसकी खुशी को शब्दोंमे बयान नही कर पाऊंगी.. यह माँ अन्नपूर्णा का हमे आशीर्वाद मिला हप्त ऐसा में मानती हूं... "
प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या संकल्पनेने आणि मोरूभाऊ सातपुते स्मृती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने तृतीयपंथीय समाजासाठी राज्यस्तरीय ह्यट्रान्सकुकह्ण पाककला स्पधेर्चे आयोजन करण्यात आले. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने राज्यात पुणे, मुंबई व औरंगाबादला यापूर्वी ही स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर १४ जूनला नागपूरला स्पधेर्चे आयोजन करण्यात आले. आज बुधवारी सिव्हील लाईन्सस्थित जवाहर विद्याथीर्गृहात अंतिम फेरी ठेवण्यात आली होती. यामध्ये चारही शहरातून विजेते ठरलेल्या १६ स्पर्धकांचा सहभाग होता. या स्पर्धकांच्या आठ जोड्या करण्यात आल्या.
या जोड्यांनी पदार्थ तयार करून दाखविले. त्यांच्यातील पाककलेच्या कौशल्याने प्रत्येक जोडी तोडीसतोड ठरली. यामध्ये पुण्याची निकिता-नेगण ही प्रथम, नागपूरच्या मोहिनी-सोनू या जोडीला द्वितीय तर पुण्याच्याच संतोषी-कलाश या जोडीला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. मुंबईच्या मयुरी-श्रीदेवी यांच्या जोडीला प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आले. अंतिम फेरीचे निरीक्षण मैत्र्या लोवळेकर, अनुराधा हवालदार, विशाखा पवार, राधा सहस्रभोजनी व सुजाता नागपुरे यांनी केले.
नागपुरीयन मेजवानी
नागपूरच्या मोहिनी व सोनू यांनी नागपुरीयन मेजवानी या शीर्षकांतर्गत, सावजी पनीर बटर मसाला, पुरी, ठेचा, आमरस, कच्च्या केळाचा मुरब्बा, कढी, लच्छा पराठा, भजी व बासुंदी असा भरगच्च मेनू अवघ्या एका तासात बनवला.