मेट्रो रेल्वेमधील व्हीसीबी अचानक बंद पडते तेव्हा ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 08:56 PM2019-11-26T20:56:38+5:302019-11-26T20:57:54+5:30

एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरून खापरीच्या दिशेने निघालेली मेट्रो रेल्वे काही अंतरावर अचानक थांबविण्यात आली. ट्रेनच्या व्हॅक्युम सर्किट ब्रेकरमध्ये (व्हीसीबी) (विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा) बिघाड झाल्याने ट्रेन थांबविण्यात आली.

When the VCB in the Metro Rail suddenly shuts down ... | मेट्रो रेल्वेमधील व्हीसीबी अचानक बंद पडते तेव्हा ...

मेट्रो रेल्वेमधील व्हीसीबी अचानक बंद पडते तेव्हा ...

Next
ठळक मुद्देमहामेट्रोची मॉक ड्रील : ४६ प्रवाशांना सुरक्षितपणे आणले स्टेशनवर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरून खापरीच्या दिशेने निघालेली मेट्रो रेल्वे काही अंतरावर अचानक थांबविण्यात आली. ट्रेनच्या व्हॅक्युम सर्किट ब्रेकरमध्ये (व्हीसीबी) (विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा) बिघाड झाल्याने ट्रेन थांबविण्यात आली. लगेच व्हॅक्युम सर्किट ब्रेकर पूर्ववत सुरू करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला, मात्र ते सुरू होत नव्हते. याची तात्काळ माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. अशाप्रसंगी ४६ प्रवाशांना स्टेशनवर सुरक्षित आणण्यात आले. मंगळवारी घेतलेली महामेट्रोची मॉक ड्रील यशस्वी ठरली.
घटनेचा तपशील जाणून घेताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुसरे पँटोग्राफ उभारण्याचे व व्हॅक्युम सर्किट ब्रेकर बंद करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर लगेच दुसरे पँटोग्राफ उभारण्यात आले, मात्र तरीही व्हॅक्युम सर्किट ब्रेकर बंद होत नव्हते. याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली व प्रवाशांना रेल्वेतून बाहेर काढण्याची परवानगी घेतली.
प्रवाशांना गाडीतून बाहेर काढण्याची घोषणा करण्याचे निर्देश ट्रेन ऑपरेटरला देण्यात आले. प्रवाशांना गाडीतून बाहेर काढण्याच्या आधी व्हायाडक्टवरचे लाईट सुरूकरण्यात आले. तसेच ट्रेन ऑपरेटरला आपातकालीन दार उघडण्याचे आदेश देत प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर साऊथ एअरपोर्ट स्टेशनच्या कंट्रोलरला याची माहिती देण्यात आली. रेल्वेतून सर्व ४६ प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर सर्वांना साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनकडे जाण्याची सूचना दिली. दोन दिव्यांग नागरिकाला स्ट्रेचरवरून नेण्यात आले. शेवटी सर्व प्रवासी एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवर आल्याची माहिती या स्टेशन कंट्रोलरने सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. रिकामी रेल्वे डेपोला पाठविण्यात आली.
प्रवासादरम्यान ट्रेन बंद पडल्यास प्रवाशांना पुढच्या स्टेशनवर सुरक्षित आणण्यासाठी कशा प्रकारच्या योजना कराव्यात, यासाठी मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण मॉक ड्रील यशस्वीरीत्या केवळ २० मिनिटात पूर्ण झाली. मॉक ड्रील पूर्ण झाल्याची सूचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली.

बुधवारपासून दर १५ मिनिटांनी मेट्रो
महामेट्रोतर्फे बुधवार, २७ नोव्हेंबरपासून वर्धा मार्गावर सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी दरम्यान (रिच-१) ताशी ८० किमी वेगाने दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा नागरिकांना उपलब्ध देण्यात येत आहे. सध्या केवळ २५ मिनिटात नागरिकांना सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी इंटरचेंजदरम्यान प्रवास करता येत आहे. बुधवारपासून प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.

Web Title: When the VCB in the Metro Rail suddenly shuts down ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.