अजनी रेल्वे पूल कधी होणार?

By Admin | Published: August 4, 2016 02:19 AM2016-08-04T02:19:37+5:302016-08-04T02:19:37+5:30

नागपुरातील अजनी रेल्वेस्थानकाशेजारी इंग्रजांच्या काळात तयार करण्यात आलेल्या रेल्वे ओव्हरब्रीजची अवस्था बिकट झाली आहे.

When will the Ajni Railway Bridge? | अजनी रेल्वे पूल कधी होणार?

अजनी रेल्वे पूल कधी होणार?

googlenewsNext

रेल्वे-महापालिकेचे निरीक्षण : नव्या पुलाचा प्रस्ताव थंडबस्त्यात
आनंद शर्मा नागपूर
नागपुरातील अजनी रेल्वेस्थानकाशेजारी इंग्रजांच्या काळात तयार करण्यात आलेल्या रेल्वे ओव्हरब्रीजची अवस्था बिकट झाली आहे. रेल्वे प्रशासन या पुलाची डागडुजी करून वेळ निभावून नेत असून कुठलीही अप्रिय घटना घडण्यापूर्वी या ठिकाणी नवा पूल तयार करण्याची मागणी होत आहे.
अजनी रेल्वे पुलावर नेहमीच खड्डे पडतात. येथून रेल्वे रुळ सहजपणे दिसतात. परंतु खड्डे बुजवून रेल्वे प्रशासन वेळ निभावून नेत आहे. हा पूल किती दिवस टिकणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत अहे. इंग्रजांनी १९२७ मध्ये हा पूल तयार केला असून त्यास ८९ वर्षे झाली आहेत. नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वे पुलाला १०० वर्ष पूर्ण झाल्यानंतर येथे रामझुला तयार करण्यात येत आहे. अजनी पुलाच्या ठिकाणी नवा पूल तयार करण्याची गरज आहे. नागपूर महानगरपालिकेने याबाबत पुढाकार घेतला होता. पुलाचे दोन प्रस्ताव तयार करण्यात आले. परंतु पुलासाठी लागणाऱ्या खर्चामुळे आणि रेल्वेने मदतीचा हात दिल्यशिवाय हा पूल शक्य नसल्यामुळे त्याचे पुढे काहीच होऊ शकले नाही.
महापालिकेचे अभियंता एम. एस. तालेवार यांनी पुलाच्या वरील भागात डांबरीकरणाचे काम महापालिका करते. तर खालील भागाची जबाबदारी रेल्वेची आहे. गुरुवारी महापालिका आणि रेल्वेच्यावतीने या पुलाची पाहणी करण्यात आली.

नव्या पुलाचा प्रस्ताव तयार
महापालिकेने रेल्वे पूल तयार करण्यासाठी दोन ते तीन प्रस्ताव तयार केले आहेत. हे प्रस्ताव रेल्वेकडे सादर करण्यता आलेले नाहीत. महापालिका आणि रेल्वेला मिळून हा पूल तयार करावयाचा आहे. यात राज्य आणि केंद्र शासनाकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येईल.’
-एम. एस. तालेवार, शहर अभियंता महापालिका
महापालिकेचा प्रस्ताव मिळाला नाही
अजनी पुलाची डागडुजी रेल्वेच्यावतीने करण्यात येते. येथे नवा पूल तयार करण्याचा प्रस्ताव अद्याप रेल्वेला मिळाला नाही. हा प्रस्ताव मिळाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Web Title: When will the Ajni Railway Bridge?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.