शहरातील भिकाऱ्यांना कधी मिळणार लस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:08 AM2021-03-10T04:08:56+5:302021-03-10T04:08:56+5:30

नागपूर : राज्यात आणि शहरात कोरोनाचे संक्रमण पुन्हा वाढीला लागले आहे. ज्येष्ठ नागरिकांना तसेच गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील ...

When will the beggars in the city get the vaccine? | शहरातील भिकाऱ्यांना कधी मिळणार लस?

शहरातील भिकाऱ्यांना कधी मिळणार लस?

Next

नागपूर : राज्यात आणि शहरात कोरोनाचे संक्रमण पुन्हा वाढीला लागले आहे. ज्येष्ठ नागरिकांना तसेच गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लस देण्याची मोहीम आरोग्य विभागाच्या माध्यामातून सरकारने हाती घेतली आहे. याचा लाभ घेण्यासाठी नागरिक पुढे येत असले तरी शहरातील भिकाऱ्यांचे काय, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी सरकारने आधार कार्ड किंवा ओळखपत्र बंधनकारक केले आहे. मात्र ज्यांच्या डोक्यावर हक्काचे छत नाही, त्यांच्याकडे आधार कार्ड असणेही शक्य नाही. एवढेच नाहीतर, केंद्रावर जाऊन लस घेण्याइतपत सामाजिक सक्षमता त्यांच्याकडे नाही. नागपूर शहरात सद्य:स्थितीत जवळपास १ हजार ६३५ भिकाऱ्यांची अंदाजित संख्या आहे. त्यांचा निश्चित आकडा यंत्रणेकडे उपलब्ध नाही.

...

- शहरात भिकाऱ्यांसाठी राज्य सरकारचे बेघर केंद्र आहे. मात्र महानगरपालिकेकडे असे केंद्र नाही. सध्या पाच बेघर केंद्रे असून, दोन केंद्रे वाढविली जात आहेत. शहरामध्ये अनेक भिकारी बाहेरून आलेले आहेत. त्यांचा नेहमी येथे वावर असतो.

- भटकत आलेले अनेक मनोरुग्णही शहरात आहेत. फुटपाथवर किंवा रस्त्याच्या कडेला मंदिराच्या आश्रयाने ते दिसतात. मात्र अशा अनेकांनी गणना किंवा नोंद नाही.

- काहींची झोपडपट्टीत घरे असली तरी ते भिक्षा मागतात. अशांकडे आधार कार्ड असण्याची शक्यता आहे. यंत्रणेला अशा व्यक्तींचा शोध घ्यावा लागणार आहे.

...

शहरातील भिकाऱ्यांचे आता सर्वेक्षण सुरू आहे. त्यांना लस देण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाईल. सर्व्हे झाल्यावर हे काम केले जाईल. त्यांचे आधार कार्ड काढले जाईल.

- सुभाष जयदेव, समाजकल्याण प्रकल्प समन्वयक

...

लसीकरण कसे होणार?

- भिकाऱ्यांचे लसीकरण कसे होणार याचे नियोजन अद्याप ठरलेले नाही. प्रत्यक्षात शहरातील भिकाऱ्यांचा नेमका आकडा महानगरपालिकेकडे नाही. लसीकरणासाठी आधार कार्ड सक्तीचे असल्याने या सर्वांचे आधार कार्ड आधी काढून घेणे हे यंत्रणेपुढचे महत्त्वाचे काम असेल.

- गंभीर आजार असणाऱ्यांना आधार कार्डची सक्ती नाही. अनेक भिकाऱ्यांचे आरोग्य कमकुवत असते. त्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर आलेल्या प्रमाणपत्राचा आधार घेऊन त्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याची तरतूद केली जाऊ शकते.

...

शहरातील भिकारी संख्या : १,६३५

पुरुष भिकारी : अंदाजे १,२००

महिला भिकारी : अंदाजे ४००

...

Web Title: When will the beggars in the city get the vaccine?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.