तुटलेल्या विद्युत तारा जाेडणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:13 AM2021-09-04T04:13:03+5:302021-09-04T04:13:03+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क पिपळा (डाक बंगला) : दाेन दिवसापूर्वीच्या वादळी वाऱ्यामुळे इसापूर (ता. सावनेर) शिवारातील विजेच्या तारा तुटल्या आणि ...

When will the broken power lines go? | तुटलेल्या विद्युत तारा जाेडणार कधी?

तुटलेल्या विद्युत तारा जाेडणार कधी?

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

पिपळा (डाक बंगला) : दाेन दिवसापूर्वीच्या वादळी वाऱ्यामुळे इसापूर (ता. सावनेर) शिवारातील विजेच्या तारा तुटल्या आणि कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित झाला. या तारा रहदारी व गुरांची ने-आण करताना अडसर ठरत असल्याने, त्या तातडीने जाेडण्याची मागणी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. परंतु, कुणीही याकउे लक्ष द्यायला तयार नसल्याने या तारा जाेडणार कधी, असा प्रश्न इसापूर येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

इसापूर शिवारात बुधवारी (दि. १) वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला. या वाऱ्यामुळे या शिवारातून गेलेल्या विद्युत तारा तुटल्या व खाली पडल्या. त्यामुळे या भागातील कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित झाला. अपघात हाेऊ नये म्हणून त्या तारांमधील वीजपुरवठा बंद करण्यात आला. या तारा गावातून कन्हान नदीकडे जाणाऱ्या मार्गावर पडून आहेत. येथील बहुतांश शेतकरी वीजपुरवठा खंडित असल्याने त्यांची जनावरे पाणी पाजण्यासाठी दाेन किमीवरील कन्हान नदीवर नेतात. त्यामुळे शेतकऱ्यांसह गुरांना या तुटलेल्या तारांचा राेज त्रास सहन करावा लागत आहे.

यासंदर्भात स्थानिक शेतकऱ्यांनी खापरखेडा (ता. सावनेर) येथील महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यांना माहिती देऊन तारा जाेडण्याची व वीजपुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली. मात्र, या तारा अद्यापही जाेडण्यात आल्या नाहीत, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. वीजपुरवठा खंडित असल्याने आणखी किती दिवस गुरांना पाणी पाजण्यासाठी कन्हान नदीवर न्यावे, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

...

वीज दुरुस्तीची कामे रखडली

महावितरण कंपनीने इसापूर येथे एका लाईनमनची नियुक्ती केली आहे. ते स्वत: घरगुती व कृषिपंपाच्या वीजदुरुस्तीची कामे कधीच करीत नसून, खासगी कामगाराकडून करवून घेतात. कामगार जाेपर्यंत मिळणार नाही, ताेपर्यंत दुरुस्तीची कामे रखडलेली असतात. दुरुस्तीची कामे वेळीच केली जात नसल्याने नागिरकांसह शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असून, प्रसंगी नुकसान सहन करावे लागते.

Web Title: When will the broken power lines go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.