कळमेश्वर शहर अतिक्रमणमुक्त कधी हाेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:10 AM2021-01-23T04:10:07+5:302021-01-23T04:10:07+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक-२ ते बाजार चाैक, कॅनरा बॅंक ते मातामाय मंदिर ते ...

When will the city of Kalmeshwar be free from encroachment? | कळमेश्वर शहर अतिक्रमणमुक्त कधी हाेणार?

कळमेश्वर शहर अतिक्रमणमुक्त कधी हाेणार?

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक-२ ते बाजार चाैक, कॅनरा बॅंक ते मातामाय मंदिर ते बाजार चाैक हे दाेन्ही मार्ग पूर्णपणे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. वाढत्या अतिक्रमणांमुळे या मार्गावरून वाहने चालविताना कसरत करावी लागत असल्याने येथील वाहतूक काेंडीमुळे अपघातही हाेत आहेत. त्यामुळे कळमेश्वर शहर अतिक्रमणमुक्त कधी हाेणार? असा प्रश्न शहरातील सूज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे.

या दाेन्ही मार्गालगत दोन्ही बाजूला किराणा दुकाने, औषध दुकाने, जनरल स्टाेअर्स, रुग्णालये, हाॅटेल्स, पानटपरी, कपड्यांची व भांड्यांची दुकाने, सायकल स्टाेअर्स, ज्वेलर्स, कृषी सेेवा केंद्र यासह अन्य प्रकारची दुकाने आहेत. या दुकानांमध्ये येणारे ग्राहक त्यांची दुचाकी वाहने मनात येईल त्या पद्धतीने राेडलगत व दुकानांच्या समोर उभी करतात. काही दुकानांसमाेर थ्री व्हिलर व फाईव्ह व्हिलर वाहने उभी असतात. या वाहनांचे चालक पानटपरीवर चहा पित वाहतूक काेंडीचा तमाशा बघत असतात.

हमाल याच वाहनांमधील माल त्यांच्या मनमर्जीने खाली करत असतात. हा मार्ग आधीच अरुंद असून, या वाहनांमुळे वाहतूक काेंडीत आणखी भर पडते. वास्तवात, या मालवाहू वाहनांसाठी फिक्स पाॅईंट निर्धारित करणे आवश्यक आहे. त्या पाॅईंटवरून दुकानांमध्ये माल सहज पाठविता येऊ शकताे. पूर्वी याच बाजारात ट्रक जायचे. आता मात्र ते जात नाहीत. येथील वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्यावतीने अधूनमधून कारवाई केली जाते. मात्र, त्याचा काहीही फायदा हाेत नाही. दुसरीकडे, प्रशासनाने वाहने उभी ठेवण्यासाठी वाहनतळाची कायमस्वरुपी निर्मिती करावी तसेच बाजारातील अतिक्रमणे हटवावी, अशी मागणी केली जात आहे.

...

शहरातील बाजार चाैकात असलेल्या अतिक्रमणांबाबत नागरिकांना ध्वनिक्षेपकावरून वारंवार सूचना दिली जाते. अनेकदा दंडात्मक कारवाईही केली जाते. या भागातील वाहनतळाची समस्या निकाली काढण्यात येईल.

- स्मिता काळे, मुख्याधिकारी,

नगर परिषद, कळमेश्वर.

Web Title: When will the city of Kalmeshwar be free from encroachment?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.