खचलेल्या विहिरींची भरपाई कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:11 AM2021-08-22T04:11:27+5:302021-08-22T04:11:27+5:30

काटोल : गतवर्षी अतिपावसामुळे तालुक्यातील १६६ विहिरी खचल्या. कृषी विभागाने तातडीने अहवाल पाठविला नसल्याने अद्यापही नुकसानभरपाई मिळाली नाही. ती ...

When will the depleted wells be compensated? | खचलेल्या विहिरींची भरपाई कधी मिळणार?

खचलेल्या विहिरींची भरपाई कधी मिळणार?

Next

काटोल : गतवर्षी अतिपावसामुळे तालुक्यातील १६६ विहिरी खचल्या. कृषी विभागाने तातडीने अहवाल पाठविला नसल्याने अद्यापही नुकसानभरपाई मिळाली नाही. ती कधी मिळणार? असा सवाल करीत काटोल तालुक्यातील सरपंच आणि शेतकऱ्यांनी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांचे प्रशासकीय उदासीनतेकडे लक्ष वेधले.

काटोल येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात शनिवारी केदार यांच्या उपस्थित शासकीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तीत तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले.

यावर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विहीर खचलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल तातडीने पाठविण्याचे आदेश दिले. नैसर्गिक आपत्तीने शेतकरी त्रस्त आहे. त्यांच्या प्रत्येक समस्येचे तातडीने निराकरण करा, अशी तंबी केदार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना याप्रसंगी दिली.

घरकूल अनुदानाच्या रकमेत शहरी व ग्रामीण अशी तफावत का? असा प्रश्न तालुक्यातील सरपंचांनी केला. याबाबत शासनाने ठोस निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. तालुक्यातील नळ योजनांची प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याचे आदेश केदार यांनी संबंधितांना दिले. आरोग्य आणि ग्राम विकासासंबंधी विविध विषयांवरही याप्रसंगी चर्चा झाली. त्या संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या.

जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, काटोलच्या नगराध्यक्षा वैशाली ठाकूर, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख, जिल्हा परिषद सभापती नेमावली माटे, उज्ज्वला बोढारे, तापेश्वर वैद्य, जि. प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे, पंचायत समितीचे सभापती धम्मपाल खोब्रागडे, उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तहसीलदार अजय चरडे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी याप्रसंगी उपस्थित होते.

---

संत्रा, मोसंबी उत्पादकांना मदत करा

डॉ. अनिल ठाकरे यांनी तालुक्यातील संत्रा-मोसंबी उत्पादकांच्या समस्येकडे लक्ष वेधले. फळमाशी व बुरशीजन्य रोगामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा-मोसंबीची गळती होत आहे. या समस्येच्या निराकरणासाठी सरकारने शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कीटक व बुरशीनाशक देण्याची मागणी त्यांनी केली. यावर सोमवारी नागपूर येथे तातडीने बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेऊ, असे केदार यांनी स्पष्ट केले.

----

खंडविकास अधिकारी संजय पाटील, उपसभापती अनुराधा खराडे, माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य समीर उमप, चंद्रशेखर चिखले, प्रताप ताटे हेही बैठकीला उपस्थित होते.

210821\img-20210821-wa0158.jpg

आढावा बैठकीला उपस्थित्यांच्या प्रशांचे निराकरण करतांना पशु संवर्धन दुग्ध विकास मंत्री सुनील केदार

Web Title: When will the depleted wells be compensated?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.