धानला-काेदामेंढी राेडची दुरुस्ती करणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:09 AM2021-05-26T04:09:41+5:302021-05-26T04:09:41+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : धानला-काेदामेंढी हा माैदा तालुक्यातील प्रमुख मार्गापैकी एक मार्ग आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे तयार ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : धानला-काेदामेंढी हा माैदा तालुक्यातील प्रमुख मार्गापैकी एक मार्ग आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे तयार झाले असून, ते अपघातांना निमंत्रण देत आहेत. या भागात लाेकप्रतिनिधींची काही कमी नसली तरी अंतर्गत राजकारणामुळे कुणीही या राेडच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घ्यायला तयार नाही. यात सामान्य नागरिकांना राेज त्रास सहन करावा लागत असल्याने राेडची दुरुस्ती नेमकी कधी करणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
माैदा तालुक्यातील पिंपरी, खंडाळा, चारभा, सुंदरगाव, वीरशी, रेवराल, राजोली, खरडा, नांदगाव यासह अन्य गावांमधील नागरिक या राेडचा नियमित वापर करीत असून, हा मार्ग पुढे रामटेकला जात असल्याने त्यावर सतत वर्दळ असते. या गावांमधील नागरिकांना प्राथमिक आराेग्य केंद्र, खासगी दवाखाने, बँक, इतर शासकीय कार्यालयांच्या कामांसाठी या मार्गाने धानला अथवा काेदामेंढीला जावे लागते.
धानला हे आ. टेकचंद सावरकर, जिल्हा परिषद सभापती तापेश्वर वैद्य, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निशा सावरकर यांचे मूळ गाव हाेय. या मार्गावर धानला-इंदिरानगर टी-पाॅईंटजवळ तयार झालेला माेठा खड्डा अपघातास कारणीभूत ठरत आहे. ही बाब सर्व नेत्यांना माहिती आहे. मात्र, ताे खड्डा बुजविण्यासाठी ही मंडळी सार्वजिनक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याची तसदी घेत नाहीत. हा खड्डा बुजविण्याबाबत आपण अभियंता खाेब्रागडे यांना वारंवार सूचना दिली. परंतु, ते टाळाटाळ करीत असल्याचा आराेप तापेश्वर वैद्य यांनी केला आहे. दुसरीकडे, हा खड्डा सिमेंट काँक्रिटने बुजवावा लागेल. तशी सूचना गावातील कंत्राटदाराला द्यावी लागेल, अशी माहिती अभियंता खाेब्रागडे यांनी दिली.
...
अपघात टळला
आनंदकिशोर येर्लागड्डा, रा. खंडाळा, ता. माैदा आजारी असल्याने त्यांचे मित्र श्रीकांत किरपान, रा. पिपरी, ता. माैदा हे त्यांना मंगळवारी (दि. २४) सायंकाळी कारने माैदा येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये घेऊन जात हाेते. कारचालकास धानला गावाजवळचा राेडवरील माेठा खड्डा व्यवस्थित न दिसल्याने कार त्या खड्ड्यात शिरली. कार खड्ड्यातच बंद पडल्याने थांबली. त्यामुळे संभाव्य अपघात टळला. मात्र, हा खड्डा भविष्यात माेठ्या अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
===Photopath===
250521\img-20210525-wa0011.jpg
===Caption===
रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा फोटो