शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:12 AM2021-08-15T04:12:18+5:302021-08-15T04:12:18+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : सन २०२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि राेग व किडींच्या प्रादुर्भावामुळे संत्रा, माेसंबी, कपाशी, ...

When will farmers get compensation? | शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार कधी?

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार कधी?

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : सन २०२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि राेग व किडींच्या प्रादुर्भावामुळे संत्रा, माेसंबी, कपाशी, साेयाबीनच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले हाेते. शासनाच्या आदेशान्वये या नुकसानीचे सर्वेक्षण करून १० महिन्यापूर्वी त्याचा अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही भरपाई मिळाली नाही. ती मिळणार कधी, असा प्रश्न पंचायत समितीचे माजी सभापती वसंत चांडक यांच्यासह शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

मागील वर्षी सततच्या व परतीच्या पावसामुळे नरखेड तालुक्यातील खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले हाेते. त्यातच प्रतिकूल वातावरणामुळे कपाशी व साेयाबीनच्या पिकावर कीड व राेगाचा तर संत्रा व माेसंबीवर ब्राऊन राॅटचा प्रादुर्भाव झाला हाेता. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने खरीप पिकासाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये तर फळबागांसाठी प्रति हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घाेषणा राज्य शासनाने केली हाेती.

त्या अनुषंगाने कृषी व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी या नुकसानीचे सर्वेक्षण करून १५ ऑक्टाेबर २०२० राेजी राज्य शासनाला अहवाल सादर केला हाेता. याला १० महिने पूर्ण झाले तरी शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक रुपयाचीही नुकसान भरपाई दिली नाही. या नुकसानीतून नरखेड तालुका वगळण्यात आल्याने नवी समस्या निर्माण झाली हाेती. त्यामुळे शासनाने जुन्या दराने तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे अपेक्षित हाेते. ही नुकसान भरपाईदेखील मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

...

नरखेड तालुक्याला वगळले

राज्य शासनाने या नुकसान भरपाईतून नरखेड तालुक्याला वगळले हाेते. तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नवीन दराने नुकसान भरपाई मिळणार नसल्याचेही त्यावेळी सांगण्यात आले हाेते. त्यामुळे पिकांसाठी प्रति हेक्टरी ६,८०० रुपये व फळबागांसाठी प्रति हेक्टरी १८,००० रुपये या जुन्या दराने तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित हाेते.

...

२१.८३ काेटी रुपयांची आवश्यकता

मागील वर्षीच्या खरीप हंगामात नरखेड तालुक्यातील ३६,७३९ शेतकऱ्यांचे एकूण २७,३२८.६६ हेक्टरमधील विविध पिकांचे नुकसान झाले हाेते. त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एकूण २१ काेटी ८३ लाख ७६ हजार ४७२ रुपयांची आवश्यकता आहे. तालुक्यातील २३,०२८ शेतकऱ्यांचे १५,४९४.५९ हेक्टरमधील साेयाबीन पिकाचे नुकसान झाले हाेते. या साेयाबीन उत्पादकांना नुकसान भरपाई देण्यासाठी १० काेटी ५३ लाख ६३ हजार २१२ रुपयांची तर, १३,७११ शेतकऱ्यांचे ११,८३४.०७ हेक्टरमधील संत्रा व माेसंबीचे नुकसान झाल्याने त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी २१ काेटी ३० लाख १३ हजार २६० रुपयांची आवश्यकता आहे.

...

राज्य शासनाकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकली नाही. आता केंद्र सरकारने राज्याला ७०० कोटी रुपये दिले आहेत. त्या निधीतून नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने नुकसान भरपाई द्यायला हवी.

- वसंत चांडक, माजी सभापती,

पंचायत समिती, नरखेड.

Web Title: When will farmers get compensation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.