नागपुरातील खाऊ गल्ली कधी खाऊ घालणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:05 AM2018-06-08T00:05:55+5:302018-06-08T00:06:15+5:30
नागपूर शहरातील अनेक बाजारपेठेत रस्त्यांच्या कडेला फूटपाथवर खाद्यपदार्थ विक्रीचे ठेले उभे राहतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याचा विचार करता खाद्यपदार्थ विक्रे त्यांना गांधीसागर तलावाच्या बाजूला मोकळ्या जागेत खाऊ गल्ली निर्माण करण्याचा निर्णय तीन वर्षापूर्वी स्थायी समितीने घेतला होता. त्यानुसार येथे ३२ डोम उभारण्यात आले होते. परंतु गेल्या दोन वर्षापासून ते वापराविना पडून असल्याने खाऊ गल्ली कधी खाऊ घालणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील अनेक बाजारपेठेत रस्त्यांच्या कडेला फूटपाथवर खाद्यपदार्थ विक्रीचे ठेले उभे राहतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याचा विचार करता खाद्यपदार्थ विक्रे त्यांना गांधीसागर तलावाच्या बाजूला मोकळ्या जागेत खाऊ गल्ली निर्माण करण्याचा निर्णय तीन वर्षापूर्वी स्थायी समितीने घेतला होता. त्यानुसार येथे ३२ डोम उभारण्यात आले होते. परंतु गेल्या दोन वर्षापासून ते वापराविना पडून असल्याने खाऊ गल्ली कधी खाऊ घालणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
. केंद्र शासनाकडे पाठविण्यात आलेल्या राज्य सरोवरे संवर्धन प्रस्तावात गांधीसागर तलावाचा समावेश आहे. यात गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण प्रस्तावित आहे. पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाणार आहे. याचा विचार करता खाऊ गल्लीचे बांधकाम करण्यात आले आहे. यावर जवळपास ८० लाखांचा खर्च करण्यात आला आहे. ३२ डोम बांधून तयार आहेत. परंतु वापरावविना पडून असल्याने काही डोमचे स्लॅब निघण्याला सुरुवात झाली आहे.
कसे वाढणार उत्पन्न
महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडून केला जातो. प्रत्यक्षात खाऊ गल्लीच्या माध्यमातून भाडे स्वरुपात महापालिकेला वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. मात्र गेल्या दोन वर्षात याचा लिलाव करण्यात आलेला नाही. डोमचा वापर होत नसल्याने दुरुस्तीला आले आहे. प्रशासनाची अशीच उदासीन भूमिका असेल तर महापालिकेच्या उत्पन्नात भर कशी पडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सिमेंटरोड, पायºया व गेटचे काम शिल्लक
खाऊ गल्ली येथील लोखंडी गेट मोडकळीस आले आहे. येथे नवीन गेट बसविण्याची गरज आहे. तसेच येथील पायºयांचे काम अजूनही शिल्लक आहे. खाऊ गल्लीचा रस्ता सिमेंट क्रॉंक्रीटचा केला जाणार आहे. अद्याप या कामाला सुरुवात झालेली नाही. यासह अन्य कामे अजूनही शिल्लक आहेत.