कोविड निधी मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:08 AM2021-04-21T04:08:52+5:302021-04-21T04:08:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : एकीकडे दिवसागणिक कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. दुसरीकडे कोरोना महामारीवर ...

When will Kovid get funding? | कोविड निधी मिळणार कधी?

कोविड निधी मिळणार कधी?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : एकीकडे दिवसागणिक कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. दुसरीकडे कोरोना महामारीवर खर्चाबाबतचे नियोजनसुद्धा चांगलेच गडबडले आहे. अशावेळी कोरोनावर खर्च करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी उमरेड पालिकेच्या नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदोरिया यांनी केली आहे. महिनाभरापूर्वी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पालिकेला कोविड खर्चाबाबत तसेच निधीबाबत विचारणा केली होती. त्यावेळी ३५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालिका प्रशासनाने केली होती. या निधीची प्रतीक्षा पालिकेला आहे.

दरम्यानच्या काळात १४ व्या वित्त आयोगाच्या रकमेवरील जी व्याजाची रक्कम आहे, त्या रकमेतून कोरोनावर खर्च करा, असे आदेश शासनाच्या वतीने देण्यात आले होते. नगरपालिकेकडे मागील चार ते पाच वर्षापासूनची सदर व्याजाची बहुतांश रक्कम शिल्लक होती. मागील वर्षात कोरोनावर सुमारे २७ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. यावर्षीसुद्धा खर्च मोठ्या प्रमाणावर होत असल्याने निधीची गरज असल्याची बाब नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदोरिया यांनी लोकमतजवळ व्यक्त केली.

मागील वर्षी कटेन्मेंट झोन तयार करण्यासाठीच बहुतांश खर्च झाला. आता नवीन कोविड सेंटर तयार करणे, विविध सुविधा, आस्थापना, सॅनिटायझर, फवारणी आदीचा खर्च पालिका प्रशासनाच्या खांद्यावर आहे. नगरपालिका निधीतूनही कोरोनावर खर्च करता येतो. याकरिता सभेच्या ठरावानुसार खर्च करण्याची मुभा असते. सध्या निधीबाबत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पाऊल उचलावे, अशी मागणी व्यक्त होत आहे.

....

सध्या ग्रामीण रुग्णालय खर्च करावयास तयार नाही. अशावेळी लहानसहान बाबींवरसुद्धा पालिकेलाच खर्चाची जबाबदारी उचलावी लागत आहे. अंत्यविधी उरकविण्यासाठीदेखील अतिरिक्त खर्च पालिका करीत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निधी उपलब्ध करून दिल्यास नक्कीच उत्तम सुविधा देता येईल.

- विजयलक्ष्मी भदोरिया,

नगराध्यक्ष, नगर परिषद, उमरेड.

Web Title: When will Kovid get funding?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.