लोकल सेवा ग्लोबल कधी होणार ?

By admin | Published: April 14, 2016 03:18 AM2016-04-14T03:18:16+5:302016-04-14T03:18:16+5:30

नैसर्गिक आपत्तीत अग्निशमन विभागाचे जवान आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांचे प्राण व संपत्तीचे संरक्षण करतात.

When will Local Services Global? | लोकल सेवा ग्लोबल कधी होणार ?

लोकल सेवा ग्लोबल कधी होणार ?

Next

अग्निशमन विभागाला हवी ऊर्जा : अर्ध्याहून अधिक पदे रिक्त
नागपूर : नैसर्गिक आपत्तीत अग्निशमन विभागाचे जवान आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांचे प्राण व संपत्तीचे संरक्षण करतात. महापालिकेच्या अग्निशमन विभागावर शहरासोबतच ग्रामीण भागासह पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु जबाबदारी विचारात घेता, या विभागाला सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाही. केवळ कागदावर प्रस्तावांना मंजुरी दिली जात असल्याचे चित्र आहे. या विभागाला अत्याधुनिक यंत्रसामुग्री व मनुष्यबळाची गरज आहे.
आज गुरुवारी अग्निशिमन दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्ताने चिटणवीस पार्क येथे सकाळी ९.३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने या विभागाला सक्षम करण्यासाठी ठोस निर्णयाची घोषणा होण्याची अपेक्षा आहे. १९६५ च्या लोकसंख्येच्या आधारावर शहरात अग्निशमन केंद्र व कर्मचाऱ्यांची पदे निर्माण करण्यात आली होती. त्यानुसार पाच केंद्रे व १९३ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आली होती. चार दशकात ही संख्या ४११ झाली. परंतु विभागात २५० कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या चार दशकात शहराची लोकसंख्या ३० लाखांवर गेली आहे. दोन लाख लोकसंख्येमागे एक अग्निशमन केंद्र असायला हवे, त्यानुसार शहरात १५ केंद्रांची गरज आहे. त्यानुसार ८७२ कर्मचाऱ्यांची गरज आहे. नवीन आकृतिबंध राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. याला शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर नवीन भरती प्रक्रि या सुरू केली जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: When will Local Services Global?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.