राज्यातील वृद्ध कलावंतांना कधी मिळणार पेन्शन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:08 AM2021-02-10T04:08:17+5:302021-02-10T04:08:17+5:30

- नोव्हेंबरपासून मानधनाचे वाटपच नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र हे कलावंतांचे राज्य आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू ...

When will the old artists of the state get pension? | राज्यातील वृद्ध कलावंतांना कधी मिळणार पेन्शन?

राज्यातील वृद्ध कलावंतांना कधी मिळणार पेन्शन?

googlenewsNext

- नोव्हेंबरपासून मानधनाचे वाटपच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्र हे कलावंतांचे राज्य आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. देशात नाट्यकला जोपासण्याचा अग्रक्रम महाराष्ट्राचा लागतो. सोबतच तमाशा, शाहिरी, लावणी, खडी गंमत, दंडार, दशावतारसारख्या लोककला आणि अन्य आदिम कलांचे संगोपन महाराष्ट्रात लोकपातळीवर लपलया केले जात आहे. त्यातच अनेक कलाप्रकार दुर्लक्षित होत असल्याने अखेरच्या घटका मोजत आहेत. अशा स्थितीत राज्यातील कलावंतांना, साहित्यिकांना संजीवनी देण्याचे प्रयत्न राज्यशासनामार्फत सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आपापल्या कलाक्षेत्रात कार्यरत वृद्ध कलावंतांना पेन्शन स्वरूप मानधन देण्याची योजना बरीच वर्षे अमलात आहे. मात्र, गेल्या नोव्हेंबर पासून ही योजना बाधित पडली आहे. त्यामुळे, ज्येष्ठ कलावंत आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

पॉईंटर्स

मानधन बाधित ज्येष्ठ कलावंतांची संख्या

* महाराष्ट्र - २८,०००

* विदर्भ - ५,५००

* नागपूर - १,५००

मानधन किती (रुपये प्रति माह)

* ‘अ’ श्रेणी : राष्ट्रीय पातळीवरील कलाकार, साहित्यिक - ३१५० रुपये

* ‘ब’ श्रेणी : राज्य पातळीवरील कलाकार, साहित्यिक - २७०० रुपये

* ‘ब’ श्रेणी : जिल्हा पातळीवरील कलाकार, साहित्यिक - २२५० रुपये

समितीची नेमणूक झाली की लगेच मानधन

पूर्वी मानधनाचे वाटप जिल्हा परिषदेकडून होत होते. आता सांस्कृतिक संचालनालयाकडून वितरित केले जाते. वृद्ध कलावंत समितीची नेमणूक व्हायची आहे. पालकमंत्री शुक्रवार-शनिवारकडे याबाबत बैठक घेणार आहेत. समितीमार्फत यंदा ६० ऐवजी १०० नव्या वृद्ध कलावंतांची निवड करण्याचे आदेश सरकारकडून आले आहेत. समितीची नेमणूक झाल्यावर वृद्ध कलावंतांचे मानधन वितरित होतील. - बाबासाहेब देशमुख, समाजकल्याण अधिकारी, नागपूर

शुक्रवारपासून मानधन जमा होण्यास सुरुवात

राज्य शासनाने वृद्ध कलावंतांसाठी १८ कोटीचा निधी जारी केला असून, याबाबतची बिले तयार झाली आहेत. साधारणत: शुक्रवार ते मंगळवारपर्यंत नोव्हेंबर, डिसेंबर २०२०चे मानधन जमा केले जाईल. जानेवारीचे मानधन समित्यांच्या सूचनेनुसार प्राप्त होईल.

- बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य

समिती नेमण्याचा प्रस्ताव धूळखात

गेल्या दोन वर्षापासून वृद्ध कलावंत मानधन समितीची नेमणूक झालेली नाही. समाजकल्याणकडे पाठविलेला प्रस्ताव धूळखात आहे. त्यामुळे नवे वृद्ध कलावंत मानधनापासून वंचित आहेत. राज्र्य सरकारसोबतच केंद्राचेही मानधन या वृद्ध कलावंतांना मिळत असते. मात्र, विदर्भातील कलावंतांना हा लाभ फारच उणिवेने मिळतो आहे. राज्य सरकारने केंद्राच्या मानधनाचा लाभही देणे अपेक्षित आहे. राज्याच्या मानधानासाठी ५० वर्षे तर केंद्राच्या मानधनासाठी ६० वर्षे वय पूर्ण झालेली असावी, असा नियम आहे.

- धर्मदास भिवगडे, केंद्रीय अध्यक्ष, विदर्भ शाहीर कलावंत परिषद ()

............

Web Title: When will the old artists of the state get pension?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.