मेमाे लाेकल, पॅसेंजर कधी सुरू करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:07 AM2021-06-26T04:07:42+5:302021-06-26T04:07:42+5:30
मंगेश तलमले लाेकमत न्यूज नेटवर्क खात : हजाराे गरीब नागरिकांच्या प्रवासाचे हक्काचे साधन असलेल्या मुंबई-नागपूर-हावडा मार्गावरील मेमाे लाेकल व ...
मंगेश तलमले
लाेकमत न्यूज नेटवर्क
खात : हजाराे गरीब नागरिकांच्या प्रवासाचे हक्काचे साधन असलेल्या मुंबई-नागपूर-हावडा मार्गावरील मेमाे लाेकल व पॅसेंजर या रेल्वेगाड्या काेराेना संक्रमणामुळे दीड वर्षभरापूर्वी बंद करण्यात आल्या. लाॅकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतरही या गाड्या सुरू करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे खात (ता. माैदा) रेल्वेस्थानकाहून नागपूर व भंडारा येथे राेजगारासाठी जाणाऱ्या शेकडाे गरीब प्रवाशांची गैरसाेय हाेत आहे. या रेल्वेगाड्या कधी सुरू हाेणार असा प्रश्न गरीब प्रवाशांना पडला आहे.
मुंबई-नागपूर-हावडा रेल्वेमार्ग खात येथून जाताे. खातची लाेकसंख्या आठ हजाराच्या आसपास असून, येथील रेल्वेस्थानकाहून खातसह परिसरातील ३० गावांमधील नागरिक नागपूर व भंडारा येथे ये-जा करण्यासाठी मेमाे लाेकल व पॅसेंजरचा नियमित वापर करायचे. यात नागपूर व भंडारा येथे नाेकरी व उपजीविकेसाठी राेज प्रवास करणाऱ्यांची संख्या बरीच माेठी आहे. काेराेना संक्रमणामुळे या दाेन्ही गाड्या मार्च-२०२० मध्ये बंद करण्यात आल्या असून, त्या अद्यापही सुरू करण्यात आल्या नाहीत.
गाेंदिया-इतवारी (नागपूर) मेमाे लाेकल, इतवारी (नागपूर)-डाेंगरगड (छत्तीसगड) मेमाे लाेकल, रायपूर-इतवारी (नागपूर) पॅसेंजर, इतवारी (नागपूर)-तिरोडी (मध्य प्रदेश) लोकल या रेल्वेगाड्या नागपूर व भंडाऱ्याला राेज ये-जा करणाऱ्या शासकीय, निमशासकीय कर्मचारी, हातमजुरी करणारे, बांधकाम कामगार, छाेटे व्यावसायिक, गवंडी काम करणारे, दूध विक्रेते यांच्यासह इतरांसाठी अतिशय साेयीच्या हाेत्या. या गाड्या बंद असल्याने या सर्वांची माेठी गैरसाेय हाेत असून, यांची संख्या बरीच माेठी आहे. काही जण या गाड्यांमध्ये खाद्यपदार्थ व इतर साहित्याची विक्री करून उपजीविका करायचे. या गाड्या बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. त्यामुळे या गाड्या तातडीने सुरू करणे गरजेचे आहे.
...
वेळेसाेबतच पैसाही खर्च
य गाड्या बंद असल्याने संबंधित नागरिकांना राेज नागपूर व भंडारा येथे माेटरसायकल, कार अथवा अन्य वाहनांनी प्रवास करावा लागताे. यात त्यांना पेट्राेल, डिझेलवर अतिरिक्त खर्च करावा लागत असून, वेळही अधिक जात असल्याने त्यांना अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. हा प्रवास कर्मचारी व व्यावसायिकांसाठी थाेडाफार परवडणारा असला तरी कामगार, दूध विक्रेते व गरीबांच्या आर्थिक आवाक्याबाहेर आहे. या प्रवासात आपल्याला राेज किमान २०० रुपये अतिरिक्त खर्च करावे लागत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.
...
या मार्गावरील गाड्या
खात रेल्वेस्थानकाहून गोंदिया-इतवारी (नागपूर) मेमो लाेकल राेज सकाळी ७.५४ वाजता, त्यानंतर रायपूर-इतवारी (नागपूर) पॅसेंजर, तिरोडी -इतवारी (नागपूर) टीटी लाेकल नागपूरच्या दिशेने प्रस्थान करायची. शिवाय, सायंकाळी इतवारी (नागपूर)हून परत येण्यासाठी इतवारी (नागपूर)-रायपूर पॅसेंजर, इतवारी (नागपूर)-डोंगरगड मेमो लाेकल व इतवारी (नागपूर)-तिरोडी लोकल या गाड्या असायच्या. त्यामुळे नागरिकांचा राेजचा प्रवास कमी खर्चात व आरामात व्हायचा.