प्रभागरचना कधी होणार?

By admin | Published: July 28, 2016 02:29 AM2016-07-28T02:29:18+5:302016-07-28T02:29:18+5:30

केंद्रात व राज्यात सत्तेत असल्याने महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

When will Prabhakaran be? | प्रभागरचना कधी होणार?

प्रभागरचना कधी होणार?

Next

नागपूर : केंद्रात व राज्यात सत्तेत असल्याने महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काँग्रेससह विरोधकही कामाला लागले आहे. परंतु अद्याप प्रभागाची रचना निश्चित न झाल्याने नगरसेवक संभ्रमात आहेत.

चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका होणार आहेत. नवीन प्रभागात प्रत्येकी ३५ ते ४० हजार मतदार राहणार आहेत. प्रभागाचे क्षेत्रफळ वाढणार आहे. प्रभागाला कोणता भाग जोडला जाईल, याविषयी अंदाज बांधले जात आहे. संभाव्य प्रभाग विचारात घेऊ न काहींनी जनसंपर्काला सुरुवातही केली आहे.
गेल्या निवडणुकीत ७२ प्रभागातून १४५ नगरसेवक निवडून आले होते. यावेळी ३८ प्रभागातून १५१ नगरसेवक निवडून येणार आहेत. एका प्रभागातून चार सदस्य निवडून द्यावयाचे असले तरी पक्षाच्या चार उमेदवारांपैकी सक्षम उमेदवारांवर प्रभागातील निवडणुकीचा कल ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या निवडणुकीत १० अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. यावेळी प्रभागाचे क्षेत्रफळ वाढणार असल्याने अपक्ष नगरसेवक ांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना पक्षाच्या निशाणीचा लाभ होण्याचा अंदाज असला तरी चार उमेदवारांच्या पॅनलमधील सक्षम उमेदवाराचा इतर तीन जणांना लाभ मिळणार आहे.
चार सदस्यीय प्रभागात दोन जागा महिलांसाठी राखीव राहणार आहे. काही प्रभागात अनुसूचित जाती व जमातीच्या उमेदवारांसाठी एक जागा राखीव असली तरी एका जागेवर ओबीसी वा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे. गेल्या निवडणुकीत दोन सदस्यीय पद्धती होती. यातील एक जागा महिलांसाठी राखीव असल्याने उरलेली एक जागा काही प्रभागात अनुसूचित जाती, जमातीसाठी राखीव असल्याने अनेक मातब्बरांना निवडणूक लढविता आली नव्हती. यावेळी मात्र त्यांची इच्छा पूर्ण होणार असल्याने अनेक प्रभागातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)

अपक्षांची मनधरणी
भाजपने या निवडणुकीत ‘मिशन १००’ घोषणा केली आहे तर ‘अभी नही तो कभी नही’ अशी भूमिका घेत काँग्रेस मैदानात उतरणार आहे. पक्षातील सर्व गट प्रथमच एकत्र आले आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागाचे समीकरण कसे राहील याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. अनेक प्रभागात अपक्ष नगरसेवकांची भूमिका निर्णायक राहणार असल्याने त्यांना पक्षात घेण्यासाठी भाजप व काँग्रेस कामाला लागले आहेत.

 

Web Title: When will Prabhakaran be?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.