रेल्वे स्थानकावरील सुरक्षा भिंत कधी होणार पूर्ण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:10 AM2021-03-13T04:10:59+5:302021-03-13T04:10:59+5:30
अवैध व्हेंडर, असामाजिक तत्त्वांचा उपयोग नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर नेहमीच प्रवाशांचे साहित्य चोरीला जाते. अवैध व्हेंडर, असामाजिक तत्त्व ...
अवैध व्हेंडर, असामाजिक तत्त्वांचा उपयोग
नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर नेहमीच प्रवाशांचे साहित्य चोरीला जाते. अवैध व्हेंडर, असामाजिक तत्त्व रेल्वे स्थानकाच्या परिसरात वावरतात. त्यामुळे नागपूर ते अजनी रेल्वे स्थानकादरम्यान सुरक्षा भिंत उभारण्याची योजना होती, परंतु मागील वर्षभरापासून हा प्रस्ताव धूळखात पडला आहे.
नागपूर ते अजनी रेल्वे स्थानकादरम्यान सुरक्षा भिंत नाही. याचा फायदा अवैध व्हेंडर घेतात. असामाजिक तत्त्व ही रेल्वे स्थानकाच्या परिसरात शिरतात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे महागडे साहित्य चोरीला जाते. या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नागपूर ते अजनी रेल्वे स्थानकादरम्यान सुरक्षा भिंत उभारण्याची योजना आखली आहे. सुरक्षा भिंतीचा भाग लोहापूल परिसरापर्यंत पूर्ण करण्यात आला आहे. परंतु पुढील काम मात्र थंड बस्त्यात पडले आहे. यामुळे असामाजिक तत्त्वांचे फावत आहे. त्यांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने त्वरित सुरक्षा भिंतीचे काम हाती घेण्याची मागणी होत आहे.
......
सुरक्षा भिंत महत्त्वाची
"रेल्वे प्रवाशांचे महागडे साहित्य नेहमीच चोरीला जाते. असामाजिक तत्त्व सुरक्षा भिंत नसल्यामुळे रेल्वे स्थानकाच्या परिसरात शिरतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्वरित सुरक्षा भिंत उभारण्याची गरज आहे.
-बसंत कुमार शुक्ला, महासचिव भारतीय यात्री केंद्र
......