सात लाखांच्या दंडाची वसुली होणार कधी?

By admin | Published: May 12, 2016 02:57 AM2016-05-12T02:57:11+5:302016-05-12T02:57:11+5:30

अन्न व औषधी प्रशासन विभागाने गेल्या तीन वर्षांत सुमारे साडेनऊ कोटी रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे.

When will the seven lakh fine be recovered? | सात लाखांच्या दंडाची वसुली होणार कधी?

सात लाखांच्या दंडाची वसुली होणार कधी?

Next

‘एफएसएसए’अंतर्गत कारवाई :
तीन वर्षांत साडेनऊ कोटींचे प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त
नागपूर : अन्न व औषधी प्रशासन विभागाने गेल्या तीन वर्षांत सुमारे साडेनऊ कोटी रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. ‘एफएसएसए’च्या (फूड सेफ्टी अ‍ॅन्ड स्टँडर्डस् आॅथोरिटी) नियमांतर्गत या कालावधीत २८७ न्यायिक प्रकरणे निश्चित करण्यात आली व दोषींना ४१ लाखांहून अधिकचा दंड ठोठावण्यात आला. परंतु यापैकी सुमारे साडेसात लाख रुपयांचा दंड अद्यापही वसूल करण्यात आलेला नाही. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत अन्न व औषध प्रशासन विभागाकडे विचारणा केली होती. २०१३ पासून किती कारवाई झाली, यात किती मुद्देमाल जप्त झाला तसेच दोषींना किती दंड ठोठावण्यात आला, यासारख्या मुद्यांबाबत त्यांनी माहिती मागितली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार एप्रिल २०१३ ते मार्च २०१६ या कालावधीत विभागातर्फे ३१९ कारवाई करण्यात आल्या. यात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा १५ हजार ९२४ किलो वजनाचा ९ कोटी ४७ लाख २५ हजार २४३ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या कालावधीत ‘एफएसएस’च्या कलम ६८ अंतर्गत ३८७ न्यायालयीन प्रकरणे दाखल करण्यात आली. यातील २८७ प्रकरणे निश्चित झाली व २४८ प्रकरणांमध्ये दोषींना दंड ठोठावण्यात आला. दोषींना एकूण ४१ लाख १ हजार ६३ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. परंतु यातील ७ लाख ४६ हजार ४०० रुपयांचा दंड संबंधितांनी भरलेलाच नाही किंवा त्याची वसुली झालेली नाही. यातील ३५ हजारांचा दंड हा प्रत्यक्ष पाहणीच्या वेळी दोषी आढळलेल्यांना करण्यात आला होता. १९१ प्रकरणांत नमुन्यांमध्ये अनियमितता आढळल्यामुळे दंड ठोठावण्यात आला.(प्रतिनिधी)

Web Title: When will the seven lakh fine be recovered?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.