सुपारीचा डब्बा कधी फुटणार?

By admin | Published: May 28, 2016 02:47 AM2016-05-28T02:47:28+5:302016-05-28T02:47:28+5:30

पोलिसांनी तयार केलेल्या डब्यातील सट्टेबाजांच्या यादीत आपलेही नाव असू शकते, अशी भीती असल्याने सडक्या सुपारीवाल्यांनी कारवाई टाळण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी चालवली आहे.

When will the supari box be broken? | सुपारीचा डब्बा कधी फुटणार?

सुपारीचा डब्बा कधी फुटणार?

Next

नरेश डोंगरे नागपूर
पोलिसांनी तयार केलेल्या डब्यातील सट्टेबाजांच्या यादीत आपलेही नाव असू शकते, अशी भीती असल्याने सडक्या सुपारीवाल्यांनी कारवाई टाळण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी चालवली आहे. त्यांची अस्वस्थता लक्षात घेता सुपारीच्या गोरखधंद्यात गुंतलेल्या एका दलालाने ‘साहाब से बात हो गयी’ म्हणत त्यांना लाखोंची टोपी घातल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, लाखो रुपये घेऊन संबंधित दलाल दोन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असल्याने सुपारीवाल्यांची स्थिती अडकित्त्यात सापडल्यासारखी झाली आहे. दुसरीकडे सडक्या सुपारीतून बनावट सुगंधित पान मसाला, गुटखा तयार करून लाखो निरपराधांच्या जीवाशी खेळणारे सडक्या सुपारीवाले हजारो कोटींच्या डब्याच्या सट्टेबाजीत गुंतले आहेत. त्यामुळे त्यांच्या सुपारीचा डब्बा कधी फुटणार, असा प्रश्न चर्चेला आला आहे.

उपराजधानीत सडक्या सुपारीचा गोरखधंदा जोरात आहे. इतवारी, वर्धमाननगर, गांधीबाग, कळमना, खामला, धरमपेठमधील काही गल्लाभरू मंडळी सडक्या सुपारीच्या माध्यमातून लाखो लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे. त्यांना नामांकित कंपन्यांच्या सुगंधित पान मसाल्याच्या नावाखाली सडक्या सुपारीपासून बनविलेला सुगंधित पान मसाला, गुटखा खाऊ घालून कॅन्सरसारख्या भयावह रोगाच्या जबड्यात ढकलत आहे. नागपुरातून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेशमध्येही सडक्या सुपारीचे उत्पादन पाठविले जाते. त्यातून रोज करोडोंची उलाढाल होते.

कारवाई टाळण्यासाठी धावपळ
नागपूर : कारवाईचे अधिकार असलेली काही भ्रष्ट मंडळी तसेच पोलिसांना लाखोंची मलाई खाऊ घातली जाते. त्यामुळे कोट्यवधींचा हा काळा पैसा संबंधित व्यापारी डब्याच्या धंद्यात गुंतवतात. सडक्या सुपारीच्या गोरखधंद्यात गुंतलेल्यांपैकी बहुतांश जण डब्याच्याही सट्टेबाजीत गुंतले आहेत.
गुन्हे शाखेने डब्याचे झाकण उघडल्यापासून सुपारीवाल्यांचे दातही कारवाईच्या भीतीने वाजत आहेत. तीन दिवसांपूर्वी अटकेतील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला गेल्याने डब्यातील सुपारीवाल्यांची अस्वस्थता तीव्र झाली आहे. वरकरणी पोलीस शांत दिसत असली तरी आतमधून बारीक तपास सुरू असल्याची माहिती मिळाल्याने डब्बेबाज सुपारीवाल्यांनी कारवाईचे बालंट टाळण्यासाठी धावपळ चालवली आहे. कोणत्याही स्थितीत कारवाई टाळण्यासाठी सडक्या सुपारीवाल्यांनी या गोरखधंद्यात पुढे असलेल्या अग्रवाल, आनंद, श्याम, ओके, विजय, गणेश आणि अन्य काही जणांना पुढे केले आहे. त्यांनी एका दलालाला हाताशी धरले. (प्रतिनिधी)

Web Title: When will the supari box be broken?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.