महिलेला न्याय मिळणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:08 AM2021-01-04T04:08:32+5:302021-01-04T04:08:32+5:30
चक्रधर गभणे लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : जिवंत महिलेला कागदाेपत्री मृत दाखवून तिला शासकीय याेजनांच्या लाभांपासून वंचित ठेवण्यात आले. ...
चक्रधर गभणे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : जिवंत महिलेला कागदाेपत्री मृत दाखवून तिला शासकीय याेजनांच्या लाभांपासून वंचित ठेवण्यात आले. प्रशासनाच्या या चुकीमुळे तिला माेडकळीस आलेल्या घरामध्ये वास्तव्य करावे लागत असून, तिला पंतप्रधान घरकुल याेजनेचा लाभ घेता येत नाही. खात (ता. माैदा) येथील हा प्रकार उघडकीस येऊन त्या गरीब महिलेला न्याय मिळाला नाही.
छबीबाई बागडे (वय ५२, रा. खात) यांच्या पतीचे निधन झाल्याने, तसेच मूलबाळ नसल्यााने त्या एकट्याच माेडकळीस आलेल्या घरामध्ये जीवन व्यतीत करीत आहे. त्यांनी घराच्या बांधकामासाठी पंतप्रधान घरकुल याेजनेचा लाभ मिळावा म्हणून प्रशसनाकडे अर्ज केला हाेता. ग्रामपंचायतच्या सन २०१४-१५ मधील पत्रक ‘ब’ मधील पंतप्रधान घरकुल याेजनेच्या यादीत अनुक्रमांक-४० मध्ये त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला.
ग्रामपंचायत प्रशासनाने ठराव घेत त्या मृत असल्याचे दाखविण्यात आले. काही वर्षे प्रतीक्षा केल्यानंतर त्यांनी पंचायत समितीचे माजी सदस्य मुकेश अग्रवाल यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीकडे चाैकशी केली. त्यांना कागदाेपत्री मृत दाखविल्याचे चव्हाट्यावर आल्याने खळबळ उडाली. त्यामुळे त्यांनी प्रशासनाने केलेल्या जुन्या नाेंदी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली. परंतु, प्रशासनाने अद्यापही नाेंदी रद्द केल्या नाहीत. जाेवर जुन्या नाेंदी रद्द करून त्या हयात असल्याचे कागदाेपत्री दाखविले जात नाही, ताेपर्यंत त्यांना शासनाच्या याेजनांचा लाभ मिळणार नाही. आपल्याला न्याय मिळणार कधी, असा प्रश्न छबीबाई बागडे यांनी केला आहे.
....
या प्रकाराला दाेषी काेण?
त्यांना मृत दाखविण्याचा प्रकार ग्रामसभेतील ठरावाद्वारे करण्यात आला आहे. या सभेला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तसेच नागरिक उपस्थित हाेते. त्यामुळे या प्रकाराला जबाबदार काेण, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित हाेताे. ही चूक दुरुस्ती करण्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाला लेखी कळविण्यात आले. मात्र, तातडीने कारवाई करण्यास प्रशासन तयार नाही. यश प्रकरणात कुणाला जबाबदार धरले जाईल, हेही अधिकारी सांगायला तयार नाहीत.
...
घर काेसळण्याची शक्यता
छबीबाई बागडे यांचे घर माेडकळीस आले आहे. पावसाची सर काेसळल्यास त्यांच्या घराच्या छताला गळती लागत असल्याने संपूर्ण घर आतून ओले हाेते. त्यामुळे घरात बसायला काेरडी जागाही मिळत नाही. उपजीविकेसाठी त्यांनी घरीच छाेटे दुकान सुरू केले असून, त्या भजी विकतात. त्यांचे घर काेसळून जीवितहानी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांना घरकुल याेजनेचा तातडीने लाभ मिळणे गरजेचे आहे.