कोविडकाळात आरएसएसकडे शेकडो कोटी रुपये कुठून आले? ईडी व आयकर विभागाकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2021 07:10 AM2021-10-03T07:10:00+5:302021-10-03T07:10:02+5:30

Nagpur News राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) विरुद्ध ईडी आणि आयकर विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.

Where did the RSS get hundreds of crores of rupees during the covid period? Complaint to ED and Income Tax Department | कोविडकाळात आरएसएसकडे शेकडो कोटी रुपये कुठून आले? ईडी व आयकर विभागाकडे तक्रार

कोविडकाळात आरएसएसकडे शेकडो कोटी रुपये कुठून आले? ईडी व आयकर विभागाकडे तक्रार

googlenewsNext
ठळक मुद्देआरएसएसचे @RSSorg या नावाने ट्विटर अकाऊंट आहे. या अकाऊंटवर आरएसएसने १ कोटीपेक्षा जास्त लोकांना रेशनिंग किट, ७ कोटी लोकांना तयार जेवणाची पाकिटे तर २७ लाख स्थलांतरितांना मदत आणि १३ लाख परप्रांतीय लोकांना मदत केल्य़ाचे दावे केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) विरुद्ध ईडी आणि आयकर विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. कोरोनाच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सामाजिक कार्यासाठी खर्च केलेले शेकडो कोटी रुपये कुठून आले याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी या तक्रारीद्वारे ईडीकडे केली आहे. (Where did the RSS get hundreds of crores of rupees during the covid period? Complaint to ED and Income Tax Department)

मोहनीश जबलपुरे यांच्या मतानुसार या सगळ्यावर झालेला खर्च हा साधारण १ हजार कोटींच्या आसपास आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही नोंदणीकृत संस्था नाही आणि त्यांचे बँकेत खातेही नाही मग त्यांच्याकडे एवढा निधी आला कुठून. एवढेच नाही तर पहिल्या लॉकडाऊन काळात कुणी घराबाहेर पडू शकत नव्हतं तेव्हा आरएसएसने एवढा निधी कुठून उभा केला, असा प्रश्नही जबलपुरे यांनी उपस्थित केला आहे.

- लोकसहभागातून खर्च

कोरोनाच्या संकट काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी गरजूंना निस्वार्थी भावनेने मदत केली. यात विविध संघटना, समाज बांधव एकत्रित आले होते. स्वयंसेवकांच्या सहकार्याने लोककल्याण समिती, सेवाभारती या संस्थांनी मदत केली. या संस्था नोंदणीकृत असून सर्व कार्याचे ऑडिटदेखील होते. संस्थांचे बँक खाते देखील आहे. यातील कारभार पारदर्शक असून कुणाच्याही आरोपांमुळे आमचे सेवाकार्य थांबणार नाही, असे मत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले. अनेक ठिकाणी सधन लोकांनी पुढे येत संघाला आवश्यक साहित्य व जिन्नसदेखील उपलब्ध करून दिले होते.

Web Title: Where did the RSS get hundreds of crores of rupees during the covid period? Complaint to ED and Income Tax Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.