लतादीदींच्या आठवणींचा ‘जहाँ जाईएगा हमे पाईयेगा’
By admin | Published: September 29, 2014 01:04 AM2014-09-29T01:04:38+5:302014-09-29T01:04:38+5:30
लतादीदी म्हणजे रसिकांच्या गळ्यातील ताईतच. लतादीदींचे गीत ऐक ले नाही, असा एकही दिवस रसिकांचा जात नाही. कितीही व्यस्ततेत असलो तरी लतादीदींचे गाणे कधीतरी कानावर
कलासंगमचे आयोजन : स्वरधाराचे सादरीकरण
नागपूर : लतादीदी म्हणजे रसिकांच्या गळ्यातील ताईतच. लतादीदींचे गीत ऐक ले नाही, असा एकही दिवस रसिकांचा जात नाही. कितीही व्यस्ततेत असलो तरी लतादीदींचे गाणे कधीतरी कानावर पडतेच आणि रसिक मग हे गाणे बराच काळ गुणगुणत राहतात. लतादीदींचा मधाळ स्वर लाभलेली अनेक गीते रसिकांच्या मनात अजरामर झाली आहेत. या स्वरकोकीळेच्या वाढदिवसानिमित्त दीदींच्या गीतांचा कार्यक्रम म्हटल्यावर रसिकांनी खच्चून गर्दी केली. कार्यक्रमाचे शीर्षकही जहाँ जाईयेगा हमे पाईयेगा असे होते. या कार्यक्रमात रसिकांनी दीदींच्या गीतांचा आनंद घेतला.
कलासंगम संस्थेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंटिफिक सभागृहात हा कार्यक्रम स्वरधारा संस्थेच्यावतीने सादर करण्यात आला. गायक ईशा रानडे आणि योगेंद्र रानडे यांनी यावेळी गीते सादर करून रसिकांना आनंद दिला. श्वेता शेलगावकर यांचे निवेदन लतादीदींच्या अनेक आठवणींचा पट उलगडणारे होते. यानिमित्ताने गीतकार हसरत जयपुरी, प्रेम धवन, शैलेंद्र, मजरूह सुल्तानपुरी आदींच्या गीतांचा आनंद आणि सलिल चौधरीपासून अनिल विश्वास, शंकर-जयकिशन, मदन मोहन, एस. डी, लक्ष्मीकांत प्यारेलाल आदींच्या संगीताची जादू रसिकांनी अनुभविली. ‘आएगा आनेवाला...’ या गीताने ईशाने कार्यक्रमाला प्रारंभ केला. यानंतर काही स्वंतंत्र तर काही युगल गीते इशा आणि योगेंद्र यांनी सादर करून रसिकांची दाद घेतली. यावेळी ‘ओ सजना बरखा बहार आयी.., नैनो मे बदरा छाए.., सीने मे सुलगते है अरमां.., याद किया दिल ने.., वो चुप रहे तो...देखो रुठा ना करो.., रहे ना रहे हम, मनमोहना बडे झुठे, दिल की नजर से, मुझे कितना प्यार है तुमसे, धीरे धीरे चल.., अजी रुठकर अब कहाँ जाईयेगा, रसिक बलमा, व जब याद आये, ये जिंदगी उसिकी है...’ आदी गीतांचा गुलदस्ता रसिकांच्या पुढ्यात आला. कार्यक्रमाची संकल्पना प्रद्युम्न सहस्त्रभोजनी, सशेधन डॉ. सुहास देशपांडे, विवेक देशपांडे, ध्वनी पराग घुसे, रंगमंच राजेश अमीन, प्रकाशव्यवस्था सुनील व मायकेल यांची होती. वाद्यांवर गोविंद गडीकर, रघुनंदन परसतवार, अरविंद उपाध्ये, मोरेश्वर दहासहस्त्र, श्रीकांत पिसे, गौरव टांकसाळे, निशिकांत देशमुख, उज्ज्वला गोकर्ण यांनी साथसंगत केली. (प्रतिनिधी)