वाहतूक पाेलीस गेले तरी कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:08 AM2021-08-01T04:08:42+5:302021-08-01T04:08:42+5:30
नितीन नागपुरे लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : नागपूर-अमरावती मार्गावरील जलालखेडा (ता. नरखेड) गावाशी परिसरातील ४० गावांमधील नागरिकांचा संपर्क येताे. ...
नितीन नागपुरे
लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : नागपूर-अमरावती मार्गावरील जलालखेडा (ता. नरखेड) गावाशी परिसरातील ४० गावांमधील नागरिकांचा संपर्क येताे. या पाेलीस ठाण्यात ३५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. यात वाहतूक शाखेचाही समावेश आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी (शुक्रवार) येथील मुख्य मार्गावर वाहतूक काेंडी हाेत असून, ती अपघातांना कारणीभूत ठरत आहे; मात्र वाहतूक पाेलीस राेडवर शाेधूनही दिसत नाहीत. हा प्रकार दाेन महिन्यापासून सुरू असल्याने वाहतूक पाेलीस नेमके गेले तरी कुठे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
राज्य शासनाच्या आदेशान्वये १५ जुलैपासून इयत्ता ८ ते १२ वीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली आहे. नागपूर-अमरावती मार्ग गावाच्या मध्यभागातून गेला असून, रहदारीमुळे विद्यार्थ्यांना राेड ओलांडणे धाेकादायक झाले आहे. येथील आठवडी बाजारात शुक्रवारी परिसरातील ३० गावांमधील नागरिक खरेदी-विक्रीसाठी येत असल्याने राेडवरील गर्दीत आणखी भर पडते. नागरिक त्यांची वाहने मुख्य मार्गालगत उभी करीत असल्याने राेड ओलांडणे शक्य हाेत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
या मार्गावरील बसस्थानक चाैकात वाहने व नागरिकांची गर्दी अधिक असल्याने वाहतूक नियंत्रित करण्यासाठी या ठिकाणी वाहतूक पाेलिसांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. याबाबत पाेलीस अधिकाऱ्यांना वेळाेवेळी सूचना दिली; मात्र काहीही उपयाेग झाला नाही, असा आराेप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. संभाव्य धाेका टाळण्यासाठी ही समस्या वेळीच साेडविण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.
...
रुंदीकरणामुळे वाहनांचा वेग अनियंत्रित
नागपूर-काटाेल-जलालखेडा-वरुड-अमरावती या मार्गाचे रुंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम करण्यात आले आहे. जलालखेडा येथे या मार्गाला दुभाजक तयार केले आहेत. त्यामुळे नागपूरहून अमरावती आणि अमरावतीहून नागपूरच्या दिशेने धावणाऱ्या बहुतांश वाहनांचा वेग अधिक असताे. या अनियंत्रित वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. काही दिवसांपूर्वी जलाखेडा येथे झालेल्या अपघातात दाेघांचा मृत्यू झाला तर काही जण गंभीर जखमी झाले.
...
दीपक डेकाटे यांची पुन्हा नियुक्ती करा
दीपक डेकाटे यांची जलालखेडा पाेलीस ठाण्याच्या ठाणेदारपदी वर्षभरापूर्वी नियुक्ती करण्यात आली हाेती. काेराेना संक्रमण काळात त्यांनी भरीव कामगिरी केली हाेती. परिसरातील अवैध धंद्यांवरही त्यांनी नियंत्रण मिळविले हाेते. त्यांची नागपूर शहरात बदली करण्यात आल्यानंतर परिस्थिती जैसे थे झाली आहे. त्यामुळे या भागातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करणाऱ्या दीपक डेकाटे यांची पुन्हा ठाणेदारपदी नियुक्ती करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
300721\2308img_20210730_155344.jpg
फोटो ओळी. मुख्य रस्त्यावर लागलेली गाड्यांची पार्किंग.