कोणता झेंडा घेऊ हाती ?
By admin | Published: February 9, 2017 02:27 AM2017-02-09T02:27:01+5:302017-02-09T02:27:01+5:30
नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर भाजपाचे तिकीट
सहा उमेदवार कसे बाद झाले? : पहिल्या दिवशी ११४१ तर दुसऱ्या दिवशी झाले ११३५
नागपूर : महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचा दावा केला जात असला तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. मंगळवारी अधिकाऱ्यांनी ११४१ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती दिली. मात्र दुसऱ्या दिवशी बुधवारी ११३५ उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे रिंगणातील सहा उमेदवार बाद कसे झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आॅनलाईन निवडणूक अर्ज, तक्रारीसाठी अॅप अशी अत्याधुनिक यंत्रणा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र माहिती उपलब्ध होत नसल्याने गोंधळ सुरू असल्याचे चित्र आहे. १८१३ उमदेवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. छाननीत १५० अर्ज अपात्र ठरले. परंतु अद्ययावत यंत्रणा असतानाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अपात्र उमेदवारांची नावे जाहीर करणे शक्य झाले नाही.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी निवडणुकीच्या मैदानात असणाऱ्या उमदेवारांची झोननिहाय आकडेवारी प्रकाशित करण्यात आली़ त्यात ११४१ उमदेवार रिंगणात असल्याचे जाहीर करण्यात आले़ परंतु आज बुधवारी अधिकाऱ्यांनी ११३५ उमदेवार रिंगणात असल्याचे सांगितले़ त्यामुळे सहा उमेदवार गेले कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या निवडणुकीतील प्रक्रियेबाबत सर्वसामान्यांना उत्सुकता असते़ किती अर्ज आले, कुणाचे अर्ज बाद झाले, कोण रिंगणात आहे, याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न असतो.
उमेदवारांची संख्या घटली
१८१३ उमदेवारांनी नामनिर्देशपत्र अर्ज भरले होते़ यात काही उमेदवारांनी दोन अर्ज भरले होते़ तर काहींनी आॅनलाईन अर्ज भरले मात्र अर्जाचे प्रिंट आऊट व अन्य कागदपत्रे निवडणूक विभागाकडे सादर केलेली नव्हती़ त्यामुळे प्रत्यक्ष अर्ज भरणाऱ्या उमदेवारांची संख्या १५७४ इतकी होती़ यापैकी ६ फेब्रुवारी रोजी ८१ आणि ७ फेब्रुवारी रोजी ३५२ अशा एकूण ४३३ उमदेवारांनी माघार घेतली. त्यामुळे १५१ जागांसाठी आता ११४१ उमेदवार रिंगणात होते. बुधवारी ही संख्या सहाने कमी करण्यात आली़