पोषण आहारावर लाखो रुपये खर्च होत असताना विद्यार्थ्यांचे वजन वाढेना

By सुमेध वाघमार | Published: March 9, 2023 05:05 PM2023-03-09T17:05:05+5:302023-03-09T17:25:10+5:30

२७ टक्के विद्यार्थ्यांचे वजन कमी : मेयोने केलेल्या विद्यार्थ्यांचा तपासणीतील वास्तव

While millions of rupees are spent on nutrition, students do not gain weight | पोषण आहारावर लाखो रुपये खर्च होत असताना विद्यार्थ्यांचे वजन वाढेना

पोषण आहारावर लाखो रुपये खर्च होत असताना विद्यार्थ्यांचे वजन वाढेना

googlenewsNext

नागपूर : विद्यार्थ्यांचे योग्य पोषण व्हावे, यासाठी माध्यान्ह भोजन खिचडीवर सरकार लाखो रुपये खर्च करीत आहे. असे असताना, विद्यार्थ्यांचे वजन वाढत नसल्याचे वास्तव स्थूलपणा जनजागृती व प्रतिबंध शिबिरातून पुढे आले. मेयोने केलेल्या विद्यार्थ्यांच्या तपासणीत २७ टक्के विद्यार्थी कमी वजनाचे आढळून आले.

वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग व मेयोच्यावतीने स्थूलपणा जनजागृती व उपचार अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने मेयोतील डॉक्टरांच्या एका पथकाने चिंचभुवन भारतीय विद्या भवन, शंकरनगर येथील मूकबधीर विद्यालय, गांधीनगर येथील महाराष्ट्र अध्ययन मंदिर हायस्कूल, गांधीबाग येथील पन्नालाल देवडिया हिंदी मीडियम स्कूल व राहतेकरवाडी महाल येथील साने गुरुज़ी उर्दू मीडियम स्कूलमधील २८४ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख व प्राध्यापक डॉ. दीप्ती चांद, नोडल अधिकारी डॉ. पांढरीपांडे, डॉ. प्रशांत बागडे व डॉ. राखी जोशी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

- ७६ विद्यार्थी कमी वजनाचे

अभियानात सातवी ते नवव्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या उंची आणि वजनाच्या आधारावरील ‘बीएमआय इंडेक्स’नुसार २६.७६ टक्के विद्यार्थी म्हणजे, ७६ विद्यार्थी कमी वजनाचे आढळून आले.

सात विद्यार्थी लठ्ठ, तर ३० विद्यार्थ्यांचे वजन अधिक

तपासणीमध्ये २.४६ टक्के म्हणजे, सात विद्यार्थी लठ्ठ असल्याचे, तर १०.५६ टक्के म्हणजे, ३० विद्यार्थ्यांचे वजन ‘बीएमआय इंडेक्स’पेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. या विद्यार्थ्यांना वजन नियंत्रणात ठेवण्याविषयी सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले.

 ‘बॅलेन्स’ आहाराचा अभाव

एकीकडे विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे, तर दुसरीकडे कमी वजन असलेले विद्यार्थीही आढळून येत आहेत. यावरून आपला आहार ‘बॅलेन्स’ नसल्याचे दिसून येते. यामुळे प्रत्येक पालकाने आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांचे योग्य पोषण व्हायला हवे. सोबतच मैदानी खेळ खेळणेही आवश्यक आहे.

- डॉ. दीप्ती चांद, प्रमुख औषध वैद्यकशास्त्र विभाग, मेयो

Web Title: While millions of rupees are spent on nutrition, students do not gain weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.