पांढराबोडीत गुंडाचा खून ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:08 AM2021-07-08T04:08:07+5:302021-07-08T04:08:07+5:30

नागपूर : अवैध दारूविक्रीतून सुरू असलेल्या टोळीयुद्धात अंबाझरी ठाण्यांतर्गत पांढराबोडीमध्ये गुंड अक्षय जयपुरेचा खून करण्यात आला. बुधवारी रात्री ९.३० ...

White-collar hooligan murder () | पांढराबोडीत गुंडाचा खून ()

पांढराबोडीत गुंडाचा खून ()

Next

नागपूर : अवैध दारूविक्रीतून सुरू असलेल्या टोळीयुद्धात अंबाझरी ठाण्यांतर्गत पांढराबोडीमध्ये गुंड अक्षय जयपुरेचा खून करण्यात आला. बुधवारी रात्री ९.३० वाजता घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले.

अजयनगर हिलटॉप येथील रहिवासी ३० वर्षाचा अक्षय बाबुलाल जयपुरे कुख्यात गुंड आहे. त्याच्याविरुद्ध खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचा पांढराबोडी परिसरात दबदबा होता. त्याला एमपीडीए अंतर्गत नाशिकच्या तुरुंगातही पाठविण्यात आले होते. सहा महिन्यांपूर्वी त्याची सुटका झाली होती. त्यानंतर तो पुन्हा सक्रिय झाला. अवैध दारूविक्रीतून त्याचा परिसरातील प्रतिस्पर्ध्यांशी वाद सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. याच वादातून पांढराबोडीच्या सुदामनगरीत अक्षयवर हल्ला करण्यात आला. शस्त्र आणि सिमेंटच्या विटांनी वार करून अक्षयचा खून करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. सात ते आठ जणांनी अक्षयवर हल्ला केल्याची माहिती आहे. ते अनेक दिवसांपासून अक्षयचा खून करण्याच्या प्रयत्नात होते. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. घटनास्थळाच्या जवळच एका महिलेचा गांजाचा अड्डा आहे. पांढराबोडी परिसर नेहमीच अवैध धंदे आणि गँगवॉर यामुळे चर्चेत राहिला आहे. येथे अनेकदा खुनाच्या घटनाही घडल्या आहेत. यामुळे वस्तीत पोलीस चौकी लावण्यात आली आहे. तरीसुद्धा पोलिसांना गुन्हेगारांमध्ये सुरू असलेल्या वादाची माहिती मिळत नाही. पांढराबोडीत अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत. अनेक ठिकाणी खुलेआम दारूसोबत खाण्यासाठी लागणारे खाद्यपदार्थ विकले जातात. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती मिळत नाही. पांढराबोडीत आगामी काही दिवसात गंभीर घटना घडणार असल्याची शंका सूत्रांनी व्यक्त केली आहे.

............

Web Title: White-collar hooligan murder ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.