चुना मारलेली भिंत बोलू लागली आणि खून उघडकीस आला... नागरिकांचा चौकसपणाही कामी आला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 10:27 PM2021-09-11T22:27:34+5:302021-09-11T22:28:09+5:30

Nagpur News घरी कार्यक्रम नाही. सण, उत्सवसुद्धा नाहीच. अशावेळी घरातील भिंतीला चुना का मारला. रंगकाम करण्याचे कारण तरी काय, असा प्रश्न नागरिकांना पडला. परिसरात कुजबुज सुरू झाली.

The whitewashed wall started talking and the murder was exposed ... the vigilance of the citizens also came to naught ... | चुना मारलेली भिंत बोलू लागली आणि खून उघडकीस आला... नागरिकांचा चौकसपणाही कामी आला...

चुना मारलेली भिंत बोलू लागली आणि खून उघडकीस आला... नागरिकांचा चौकसपणाही कामी आला...

Next
ठळक मुद्देआरोपींना १३ पर्यंत पोलीस कोठडी

अभय लांजेवार
लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : घरी कार्यक्रम नाही. सण, उत्सवसुद्धा नाहीच. अशावेळी घरातील भिंतीला चुना का मारला. रंगकाम करण्याचे कारण तरी काय, असा प्रश्न नागरिकांना पडला. परिसरात कुजबुज सुरू झाली. मला 'त्या'दिवशी आवाज आला होता, असे आणखी एक गूढ समोर आले. याच चर्चेच्या बाबींवर नागपूर जिल्ह्यातील उमरेडच्या रेल्वे झोपडपट्टीतील नागरिकांनी बोट ठेवले. ४-५ तास चर्चा गरम झाली. संशयितांना ठाण्यात आणले गेले. रक्ताने माखलेल्या भिंतीवर चुना मारण्याचा प्रकारही उघड्यावर आला. चुना मारलेली भिंत अखेर बोलू लागली. खून झाल्याचा पदार्फाश झाला. (The whitewashed wall started talking and the murder was exposed)


रविवारी, ५ सप्टेंबर रोजी पैशाच्या क्षुल्लक कारणावरून ग्याना रुपराव शेंडे (वय २३, रा. रेल्वे झोपडपट्टी, उमरेड) याला डोक्यावर काठीने प्रहार करून जीवानिशी ठार केले. त्यानंतर पहाटेच्या सुमारास पोत्यात मृतदेह टाकून सायकलवर मांडून निर्जनस्थळी दफन करीत विल्हेवाट लावण्यात आली. उमरेड रेल्वे झोपडपट्टी परिसरात झालेल्या या रहस्यमय घडामोडीनंतर या प्रकरणी नागरिकांची सतर्कता दिसून आली. दुसरीकडे उमरेड पोलिसांचा चालढकलपणासुद्धा चव्हाट्यावर आला.

सुरजित ऊर्फ गोलू सखाराम मांडले (वय ३०) आणि विजेन ऊर्फ विजय ऊर्फ सुकळू धनराज करतुले (२२, रा. झोपडपट्टी, उमरेड) यांना अटक झाली. तिघे मित्र होते. लोभापायी मित्रांनीच मित्राचा काटा काढला. परिसरात दहशतीचे वातावरण असून, असामाजिक तत्त्वांचे वाढलेले 'साम्राज्य' चिंतेचा विषय ठरत आहे.
५ सप्टेंबरला दुपारी ३ वाजेपासून मृत ग्यानी शेंडे हा घरी नव्हता. सायंकाळ झाली. घरी सर्वजण जेवण करीत होते. दरम्यान, ग्यानी अद्याप का आला नाही, असे विचारचक्र सुरू झाले. सर्वत्र अंधार पसरला होता. पावसाच्या सरीही सुरू होत्या. सर्वत्र विचारणा सुरू झाली. रात्र अधिक गडद होत असतानाही ग्यानी घरी परतला नाही. अशातच झोपडपट्टीमधील अनेकांनी परिसर पिंजून काढला. ग्यानी गवसला नाही. सर्वांचाच हिरमोड झाला.

अखेर दुस?्या दिवशी सोमवारी ६ सप्टेंबरला ग्यानी शेंडे हरविल्याची तक्रार देण्यात आली. फारशी चौकशी होत नसल्याचे ध्यानात येताच नागरिकांनीच पुढाकार घेत या घटेनबाबत खुनाचा संशय व्यक्त केला. रंगकाम केलेली भिंत, संशयितांच्या हालचाली, त्यांचा गुन्हेगारी स्वभाव आदी बाबींकडे लक्ष वेधले गेले. त्यानंतर 'त्या' दिशेने पोलिसांचा तपास सुरू झाला. अखेरीस खून करून मृतदेह पुरण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला.

पोत्यातून नेला मृतदेह

एकीकडे मृताची शोधाशोध सुरू होती, तर दुसरीकडे आरोपींनी लगतच्याच स्वत:च्या घरात मृतदेह पोत्यात कोंबला होता. घटनेदरम्यान रक्त भिंतीवर उडाल्याने भिंत खराब झाली होती. अशातच अगदी पहाटे मृतदेह सायकलवर ठेवून, सुमारे २ कि.मी. अंतरावर सेवामार्गाकडे नेण्यात आला. यासाठी दोन पोते आणि एका सिमेंटच्या बॅगचाही वापर आरोपींनी केला. केबल वायरसाठी खोदकाम करण्यात आलेल्या खड्डयात पुन्हा खड्डा करीत मृतदेह पुरला गेला.
शनिवारी (दि.११) उमरेडच्या जेएमएफसी न्यायालयात दोन्ही आरोपींना नेण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

Web Title: The whitewashed wall started talking and the murder was exposed ... the vigilance of the citizens also came to naught ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.