नागपूर मनपाच्या सभेत 'कालीचरण महाराज की जय' म्हणणारा 'तो भक्त नगरसेवक' कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 09:47 PM2022-01-01T21:47:31+5:302022-01-01T21:48:22+5:30

Nagpur News महात्मा गांधी यांच्याबाबत अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराज की जय, अशी घोषणा देणारा नागपूर महापालिका सभागृहात देणारा कालीचरण भक्त नगरसेवक कोण, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.

Who is the devotee corporator who says 'Kalicharan Maharaj ki jai' in Nagpur Municipal Corporation meeting? | नागपूर मनपाच्या सभेत 'कालीचरण महाराज की जय' म्हणणारा 'तो भक्त नगरसेवक' कोण?

नागपूर मनपाच्या सभेत 'कालीचरण महाराज की जय' म्हणणारा 'तो भक्त नगरसेवक' कोण?

Next
ठळक मुद्देजयघोष रेकॉर्डवरून काढण्याचे महापौरांचे निर्देश

नागपूर : महात्मा गांधी यांच्याबाबत अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराज की जय, अशी घोषणा देणारा महापालिका सभागृहात देणारा कालीचरण भक्त नगरसेवक कोण, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. यावरून सभागृहात काही वेळ सत्ताधारी व विरोधक यांच्यात काहीवेळ शाब्दिक चकमकही झाली.

महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आली होती. वंदेमातरम् गायनाने कामकाजाला सुरुवात होताच काही सदस्यांनी महात्मा गांधी की जय, अशी घोषणा केली. तर सत्ताधारी नगरसेवकांतून एकाने कालीचरण महाराज की जय, असा उद्घोष केला. यावर काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी आक्षेप घेतला. विकृत मनोवृत्तीच्या महाराजांचा सभागृहात जयघोष होत असेल तर यातून त्यांची मानसिकता काय आहे. हे निदर्शनास येते, असे म्हणत या घटनेचा निषेध केला. तर कालीचरण महाराजाचा जयघोष कुणीही केला नाही. असे सत्तापक्षनेते अविनाश ठाकरे यांनी स्पष्ट केले. म्हटले तसेल तर कामकाजातून हे वक्तव्य काढण्यात यावे. अशी सूचना केली. यावर पीठासीन महापौर मनीषा धावडे यांनी कालीचरण महाराजाचा जयघोष केला असेल तर हे वक्तव्य रेकॉॅर्डवरून काढण्याची सूचना केली.

धर्मसंसदेत महात्मा गांधी यांच्याबाबत अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराज याला रायपूर पोलिसांनी अटक केली आहे. असे असतानाही अशा वादग्रस्त महाराजांचा जयघोष सभागृहात झाल्याने मनपातील कालीचरण भक्त नगरसेवक कोण, अशी चर्चा मनपा वर्तुळात आहे.

Web Title: Who is the devotee corporator who says 'Kalicharan Maharaj ki jai' in Nagpur Municipal Corporation meeting?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.