हा कचरा कुणी साफ करायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 01:21 AM2017-10-21T01:21:48+5:302017-10-21T01:22:03+5:30

जेव्हा फटाक्यांचा आनंद आपण लुटतो, तेव्हा त्यापासून निर्माण होणारा कचराही साफ करण्याची आपलीच जबाबदारी आहे ना? मग तो कचरा साफ करताना आपण कुणाची वाट बघतो.

Who needs to clean this garbage? | हा कचरा कुणी साफ करायचा?

हा कचरा कुणी साफ करायचा?

googlenewsNext
ठळक मुद्देजनजागृतीनंतरही आम्ही उदासीन : जबाबदारी मनपाचीच का?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जेव्हा फटाक्यांचा आनंद आपण लुटतो, तेव्हा त्यापासून निर्माण होणारा कचराही साफ करण्याची आपलीच जबाबदारी आहे ना? मग तो कचरा साफ करताना आपण कुणाची वाट बघतो. शुक्रवारी नागपुरातील अनेक रस्त्यांवर फुटलेल्या फटाक्यांचा कचरा पडून दिसला. लोकांनी आपल्या घरातील परिसर साफ केला. मात्र फोडलेल्या फटाक्यांमुळे झालेला कचरा लोकांनी तसाच सोडून दिला.
हे दृश्य शहरातील स्लम, सर्वसामान्य वस्त्यांच्या तुलनेत प्रतिष्ठितांच्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आले. रामदासपेठ, बजाजनगर, वर्धमाननगर, धरमपेठ या भागांमध्ये लोकांनी रात्री फोडलेल्या फटाक्यांचा कचरा रस्त्यावर पडलेला आढळला. काही इमारतींमध्ये परिसर स्वच्छ केलेला आढळला परंतु फटाक्यांचा कचरा रस्त्याच्या कडेला लोटून ठेवला होता. तुलनेत झोपडपट्ट्या व सर्वसामान्य वस्त्यांमध्ये हे दृश्य फारच क्वचित होते. कारण उच्चभ्रू लोकांना फक्त स्वच्छता अभियानातच रस्ते झाडण्याची सवय आहे. मात्र आपल्या घरासमोरच्या रस्त्यावर आपणच केलेला कचरा, साफ करण्याची जबाबदारी मनपाची समजून दुर्लक्ष केल्याचे दिसते. गुरुवारी लक्ष्मीपूजनाला घरोघरी वस्त्यावस्त्यांमध्ये फटाके फुटले. फ्लॅटस्किममध्ये फटाके फोडण्यास जागा नसल्याने, लोकांनी रस्त्यावर येऊन फटाके फोडले. त्यामुळे रस्त्यावर फटाक्यांचा कचरा झाला. शुक्रवारी सकाळपासून मनपाचे सफाई कर्मचारी गल्लोगल्लीत झालेला कचरा साफ करण्यासाठी सकाळपासून लागले. मुख्य रस्त्यांवरील कचरा त्यांनी साफ केला. परंतु कचरा जास्त असल्याने, गल्ल्यांमध्ये ते पोहचू शकले नाही. त्यामुळे कचरा दिवसभर तसाच पडून होता.
विशेष म्हणजे फटाक्यांचा झालेला कचरा हासुद्धा घातकच असतो. यात फुटलेल्या फटाक्यांचे कागद, फटाक्यांचे रसायनमिश्रित वेस्टन हेसुद्धा घातकच असतात. याला बारुद लागलेली असते. जनावरे ती खातात. विशेषत: गार्इंनी तो खाल्यास, त्याचा परिणाम दुधावर होतो. दिवाळीच्या निमित्ताने शहरात लाखो टन फटाक्यांचा कचरा होतो. हा कचरा डम्पिंग यार्डमध्ये साठविला जातो. यात न फुटलेले फटाकेही असतात, बारुद असते. त्यामुळे डम्पिंग यार्डमध्ये आग लागण्याची शक्यता असते.

Web Title: Who needs to clean this garbage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.