नागपुरात होणारा एअरबस प्रकल्प गुजरातला कुणी पळवला?

By गणेश हुड | Published: November 7, 2024 04:45 PM2024-11-07T16:45:51+5:302024-11-07T16:47:10+5:30

शरद पवार यांचा सवाल : महाविकास आघाडीची पंचसूत्रीची ग्वाही

Who ran the Airbus project in Nagpur to Gujarat? | नागपुरात होणारा एअरबस प्रकल्प गुजरातला कुणी पळवला?

Who ran the Airbus project in Nagpur to Gujarat?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :  
नागपुरात उद्योग यावे, येथील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न होणे अपेक्षीत आहे.  परंतु महाराष्ट्रात होणारा 'फॉक्सकॉन-वेदांता' प्रकल्प गुजरातला गेला, नागपूर येथे होणारा सी-२९५ लष्करी ट्रान्सपोर्ट एअरबस हा प्रकल्प गुजरातला कुणी पळवला. प्रधानमंत्री एका राज्याची हिताची भूमिका घेत आहे, त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला. गुरुवारी पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांच्या निवडणूक प्रचारासाठी आयोजित सभेत शरद पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. 
व्यासपीठावर छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल, माजी मंत्री अनिल देशमुख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजीत वंजारी, रामकिसन ओझा, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नितेश कराळे, शेखर सावरबांधे, तानाजी वनवे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

केंद्र सरकारणे जाहीर केलेल्या आर्थिक आकडेवारीत महाराष्ट्र सहाव्या नंबरवर आहे. महिलांची स्थिती  वाईट आहे. नागपूर आणि आजूबाजूमधून ६०० महिला गायब झाल्यात. 

राज्यसरकारची जवाबदारी असूनही महिला संरक्षण देऊ शकत नाही. शेतकरी हित बघत नाही, युवकांना रोजगारात देऊ शकत नाही. यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करून भाजपच्या हातून सत्ता काढणार असल्याचे शरद पवार म्हणाले. माजी मंत्री अनील देशमुख, आमदार विकास ठाकरे, अभिजीत वंजारी, दुनेश्वर पेठे, नितेश कराळे आदींनी यावेळी मार्गदर्शन केले. 

पंचसूत्रीच्या अंमलबजावणीची गॅरंटी
महाविकास आघाडी सरकार आल्यास महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३००० रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास लागू करणार.  शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देणार,  जातनिहाय जनगणना करणार, ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करणार. २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे दिली जाणार. तसेच  बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४००० रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. या पंचसूत्रीच्या अंमलबजावणीची गॅरंटी देतो, अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली.

Web Title: Who ran the Airbus project in Nagpur to Gujarat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.