धोका झाला तर जबाबदार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:13 AM2021-08-25T04:13:05+5:302021-08-25T04:13:05+5:30
उमरेड : गांधीसागर तलाव (गावतलाव) हे नगरीचे वैभव आहे. तलावाला लागूनच पुरातन किल्ला आहे. अलीकडे तलावानजीकच्या मार्गावरून दुचाकी, चारचाकीची ...
उमरेड : गांधीसागर तलाव (गावतलाव) हे नगरीचे वैभव आहे. तलावाला लागूनच पुरातन किल्ला आहे. अलीकडे तलावानजीकच्या मार्गावरून दुचाकी, चारचाकीची वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र आहे. यामुळे तलावानजीक सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नगरपालिका कार्यालय ते गंगापूरकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. यामुळे तलावानजीकच्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वर्दळ दिसून येते. शिवाय या निसर्गरम्य परिसरातून वाहने धूम पळविली जातात. या मार्गाने काही ठिकाणी वळण तसेच मोठे स्पीडब्रेकर असल्याने अपघाताची संभावना अधिक दिसून येते.
शिवाय अनेकजण या मार्गाने ‘वॉक’ करतात. त्यांनाही जीव मुठीत घेत चालावे लागत आहे. तलावाच्या किनाऱ्यावर सुरक्षात्मक उपाययोजना केल्यास संभाव्य धोका टाळता येईल, असे नागरिकांचे मत आहे. तत्पूर्वीच नगरपालिका प्रशासनाने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी वसंत भुसारी यांनी निवेदनाच्या माध्यमातून प्रभारी मुख्याधिकारी सुवर्णा दखणे यांच्याकडे केली आहे.