मृत्यू कोणा टळले... तुझे जाणे सगळेच सांगून गेले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 12:00 AM2019-08-27T00:00:46+5:302019-08-27T00:05:13+5:30

युवा साऊंड इंजिनिअर स्वप्निल उकेच्या रूपाने, तब्बल एका वर्षापूर्वी संगीत क्षेत्रात अशीच उणीव निर्माण झाली आणि त्या उणीवेतून निर्माण झालेली पोकळी अद्यापही सगळेच जगतात आहे. त्याच्या घरी तर अजूनही अश्रूंचा बांध धो-धो वाहतो आहे. २७ ऑगस्ट हा त्याचा प्रथम स्मृतीदिन.

Who survived the death ... all told of your departure! | मृत्यू कोणा टळले... तुझे जाणे सगळेच सांगून गेले!

मृत्यू कोणा टळले... तुझे जाणे सगळेच सांगून गेले!

Next
ठळक मुद्देतुझ्या अस्तित्त्वाच्या खुणा संगीतक्षेत्रात आजही निनादत आहेतयुवा साऊंड इंजिनिअर स्वप्निल उके याचा आज प्रथम स्मृतीदिन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मृत्यू हे अटळ सत्य असले तरी, कुणाच्या तरी अस्तित्त्वाची उणीव भासली की दु:खाचा बांध फुटतोच. मग, ते माय-बाप असोत, बायको-मुले असोत वा मित्र-मंडळी! युवा साऊंड इंजिनिअर स्वप्निल उकेच्या रूपाने, तब्बल एका वर्षापूर्वी संगीत क्षेत्रात अशीच उणीव निर्माण झाली आणि त्या उणीवेतून निर्माण झालेली पोकळी अद्यापही सगळेच जगतात आहे. त्याच्या घरी तर अजूनही अश्रूंचा बांध धो-धो वाहतो आहे. २७ ऑगस्ट हा त्याचा प्रथम स्मृतीदिन.
वडीलांचा ध्वनीक्षेपकाचा व्यवसाय सांभाळल्यानंतर अल्पावधितच त्याने, त्या क्षेत्रातील प्रगल्भता आत्मसात केली. तो इतका व्यस्त झाला होता की स्वत:च्या प्रकृतीकडेही दुर्लक्ष करू लागला. खरे तर हा दुर्लक्ष कॉमन आहे. मात्र, आई-वडीलांचा सांभाळ, पत्नी आणि मुलांसाठीचे स्वत: बघितलेली स्वप्ने पूर्ण करण्याचा हव्यास त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. दरम्यान आठ वर्षापूर्वी आईला झालेल्या मेंदू ब्लॉकेजमध्ये त्याने सगळ्यांना हिमतीने आधार देत, ते संकट टोलावून लावले होते. गेल्याच वर्षी जानेवारीत त्याला दोन जुळ्या मुली झाल्या आणि मोठी मुलगी सात वर्षाची.. असा तीन लेकींचा तो बाप होता. त्याच्या दोन्ही बहिणींचे लग्न झाले होते आणि अशा तो संपूर्ण कुटूंबाचा एकटाच असा खंबीर आधार होता. मात्र.. देव कोणा जाणतो, तोची उपरा जगतो. म्हणे.. जन्म ज्याचा होतो, तोची मृत्यूला कवटाळितो... आणि पोटातील दुखणे वाढल्याने, एक दिवस डॉक्टरांकडे तपासणी केली असता, तिसऱ्या स्तरावरील कर्करोगाचे निदान झाले. हातात होती ती रिपोर्ट आणि पोटात पसरलेल्या कर्करोगाचे चित्र!
कायम हसतमुख असलेल्या स्वप्निलने, या स्थितीचाही सामना करण्याचा निर्धार केला. तो नाशिकला निसर्गोपचार करण्यासाठी गेला. मुलींची आठवण आल्याने, १९ जुलै रोजी नागपुरला आला आणि चवथ्या किमोथेरपीसाठी परत नाशिकला परतला. आई-वडील-पत्नी आणि मुलांची ती अखेरची भेट आणि २७ ऑगस्टला वार्ता आली ती स्वप्निलच्या नसण्याची. रुग्णवाहिकेने त्याचे पार्थिव आले आणि... पुढे काय बोलावे? तेव्हापासून ते आजतागायत त्याच्या आठवणी सर्वांच्या मनाला सुन्न करतात आहे आणि अश्रूंना झरा फुटतो आहे. २७ ऑगस्ट आली आणि पुन्हा त्याच नको असलेल्या आठवणी ताज्या झाल्याने, संपूर्ण कुटूंब दु:खात आहेत.

मला चौकीदार करून गेला - सत्यवान उके
काळ म्हणतात, त्यापेक्षा स्वप्निल अतिशय निष्ठूर होता. म्हणूनच, उतारवयात मला तो कुटूंबाचा चौकीदार करून गेला... अशी तिव्र वेदनादायी भावना त्याचे वडील सत्यवान उके व्यक्त करतात आहे. त्याचे जे झाले ते झाले. तो परत येणार नसला तरी त्याच्या आठवणीच तेवढ्या शिल्लक आहेत. पण, तरुणांनो तुम्ही तरी स्वत:च्या आरोग्याशी हेळसांड करू नका आणि आमच्या सारख्या म्हाताऱ्या माय-बापांना आणि तुमच्यावर विसंबून असणाºया बायका-मुलांना वाºयावर सोडू नका, अशी आर्त साद ते तरुणांना घालत आहेत.

मित्रमंडळी वाहणार आज संगीतमय श्रद्धांजली
मित्रमंडळींच्या वतीने स्वप्नीलच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात संगीतमय श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. ‘डायमण्ड्स फॉरएव्हर : अनफर्गेटेबल मेलडिज ऑफ मो. रफी-किशोर कुमार-मुकेश-आशा भोसले-लता मंगेशकर’ हा हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातून संकलित होणारा निधी, स्वप्निलच्या मुलींच्या हातात सोपविला जाणार आहे.

Web Title: Who survived the death ... all told of your departure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.