हायस्पीडला ब्रेक कोण लावणार ?

By Admin | Published: May 12, 2015 02:25 AM2015-05-12T02:25:10+5:302015-05-12T02:25:10+5:30

मध्यरात्री मद्याच्या नशेत स्वत:च्या मस्तीत मश्गुल होऊन इतरांच्या जीवाला मातीमोल समजणारे शेकडो सल्लू लोकमत

Who will bring a high-speed break? | हायस्पीडला ब्रेक कोण लावणार ?

हायस्पीडला ब्रेक कोण लावणार ?

googlenewsNext

सलमानच्या हिट अ‍ॅण्ड रन
नंतर बोध घेण्याची गरज
नागपूर :
मध्यरात्री मद्याच्या नशेत स्वत:च्या मस्तीत मश्गुल होऊन इतरांच्या जीवाला मातीमोल समजणारे शेकडो सल्लू लोकमत चमूला शहराचा फेरफटका मारला असता आढळून आले.
पोलीस केवळ थर्टीफर्स्ट आणि शिमग्यात जागोजागी लोखंडी कठडे उभारून मद्यधुंद वाहनचालकांना अटकाव करतात. रोजच्या मध्यरात्री पोलीस कोठेही नजरेस पडत नाही. उपराजधानीत बेवारस आयुष्य जगणारे शेकडो आहेत. ते रस्त्याच्या कडेला फुटपाथ, रस्ता दुभाजक, बसथांब्यांचे शेड आणि चौकातील वाहतूक पोलीस बुथचा आश्रय घेऊन रात्रीचा विसावा घेतात. रात्रपाळी आटोपून फॅक्टरी आणि कार्यालयातून बाहेर पडून घराच्या वाटेवरही शेकडो कर्मचारी असतात. मध्यरात्रीपर्यंत बार आणि हॉटेलमध्ये बसून मद्याचे पेग गळ्यात उतरवणारे मद्यपी परतीच्या वेळी मात्र मोटरसायकली आणि मोटारगाड्या बेदरकारपणे आणि हेलकावे खात चालवतात. दिवसाही हे वास्तव कायमच असते. ते या सामान्य माणसांच्या जीवाची कोणतीही परवाच करीत नाहीत.
मुंबईत १३ वर्षांपूर्वी सुपरस्टार सलमान खानने मद्याच्या नशेत बेदरकारपणे कार चालवून फुटपाथवर झोपलेल्या जीवांना चिरडले आणि निर्लज्जपणे तो पळूनही गेला. नागपुरातही अशा घटना घडल्या आणि घडत आहेत. एक-दोन दिवसच या घटनांची चर्चा होते. त्यानंतर त्या फाईलबंद होतात. सामान्यांचा हकनाक बळी जातो. आक्रोश आणि हुंदकेच तेवढे राहतात. कुटुंबाचा आधार गेल्याने सारेच निराश्रित होऊन रस्त्यावर येतात. अशा या सल्लूंना कायमचे वेसण घालणारी आणि त्यांच्या मस्तवाल कृत्याने आधारहीन झालेल्या कुटुंबांना सावणारी स्वतंत्र यंत्रणा का निर्माण केली जात नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (लोकमत चमू)

Web Title: Who will bring a high-speed break?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.