कुणाला मिळणार भाजपची उमेदवारी ? शनिवारी कोअर कमिटीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 11:03 PM2019-08-29T23:03:20+5:302019-08-29T23:05:09+5:30

विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत शनिवारी भाजपच्या शहर कार्यकारिणीच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. शिवाय निवडणूकांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांशीदेखील संवाद साधण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Who will get the BJP's nomination? Core Committee meeting on Saturday | कुणाला मिळणार भाजपची उमेदवारी ? शनिवारी कोअर कमिटीची बैठक

कुणाला मिळणार भाजपची उमेदवारी ? शनिवारी कोअर कमिटीची बैठक

Next
ठळक मुद्देइच्छुक उमेदवारांसमवेतदेखील साधणार संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी विधानसभानिवडणूकांच्या भारतीय जनता पक्षामध्ये तयारीला सुरुवात झाली आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत शनिवारी भाजपच्या शहर कार्यकारिणीच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत शहर संघटनेचा आढावा तर घेण्यात येणार आहेच. शिवाय निवडणूकांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांशीदेखील संवाद साधण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकसभा निवडणूकांनंतर भाजपातर्फे शहरभरात नवीन सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात आले. यादरम्यान नवीन मतदारांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. याशिवाय बूथप्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख व पेजप्रमुख या योजनांवरदेखील भर देण्यात आला. विधानसभेच्या निवडणूका पुढील पंधरवड्यात कधीही जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर निवडणूकांत शहर भाजपाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला हरीभाऊ बागडे तसेच विदर्भ प्रांत संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर हे प्रामुख्याने उपस्थित राहतील. यावेळी ते जागावाटपासंदर्भात पदाधिकाऱ्यांची भूमिका, विधानसभानिहाय तयारी, प्रचाराचे प्रमुख मुद्दे, जास्त जोर लावण्याची आवश्यकता असलेले भाग इत्यादींचा आढावा घेतील. रविभवन येथे सकाळी ९ वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील काही मतदारसंघात विद्यमान उमेदवार बदलला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत अहे. अशा स्थितीत इच्छुक उमेदवारांचीदेखील यावेळी चाचपणी करण्यात येईल. गर्दी टाळण्यासाठी या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ठराविकांना बोलाविण्यात आले असून तसे संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आले आहे. प्रदेश भाजपाकडून तशी यादीच आलेली आहे. याशिवाय कोअर कमिटीचे पदाधिकारीदेखील याला उपस्थित राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सहाही मतदारसंघातील पदाधिकारी तसेच इच्छुक उमेदवारांशी यावेळी संवाददेखील साधण्यात येईल.
यासंदर्भात शहराध्यक्ष प्रवीण दटके यांना विचारणा केली असता शनिवारी बैठक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यादरम्यान मुलाखती नव्हे तर पक्षसंघटनेचा आढावा व विविध महत्वाच्या मुद्द्यांवर मंथन होईल, असे त्यांनी सांगितले.

शुक्रवारी येणार हरीभाऊ बागडे
दरम्यान, हरीभाऊ बागडे यांचे शुक्रवारी रात्री ८.३५ वाजता मुंबई येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळवर आगमन होईल. शनिवारचा वेळ बैठकीसाठी राखीव असून दिवसभर ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. रात्री पुण्याकडे ते प्रयाण करतील.

Web Title: Who will get the BJP's nomination? Core Committee meeting on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.