नांदागोमुख परिसरातील अवैध धंदे कोण रोखणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:13 AM2021-08-27T04:13:12+5:302021-08-27T04:13:12+5:30
नांदागोमुख : नांदागोमुख हे गाव सावनेर तालुक्यात येत असून, केळवद पोलीस स्टेशन अंतर्गत येते. परिसरात कित्येक ठिकाणी अवैध ...
नांदागोमुख : नांदागोमुख हे गाव सावनेर तालुक्यात येत असून, केळवद पोलीस स्टेशन अंतर्गत येते. परिसरात कित्येक ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत. उमरी ढाबा, छत्रापूरचे प्रत्येक ढाबे व तेथील पारधी बेडा तसेच किराणा दुकानसुद्धा, जोगा रोडवरील ढाबा, सालई गाव तसेच नांदागोमुख या गावात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. नांदागोमुख येथे तर आता रस्त्यावरसुद्धा खुलेआम देशी दारूची विक्री होत आहे. याची जाण प्रशासनाला असून सुद्धा लक्ष देत नाही. गावाच्या बाहेर सायंकाळी शाळेच्या वरांड्यातसुद्धा टेबल, पाण्याचे कॅन लावून दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकारामुळे गावात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे परिसरातील अवैध धंद्यांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी नांदागोमुख येथील ग्रामस्थांनी केली आहे.