हे पाणी थांबविणार कोण ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 09:17 PM2019-06-19T21:17:01+5:302019-06-19T21:19:42+5:30
सार्वजनिक विहिरी मनपा प्रशासनाने स्वच्छ करून पाण्याची सोय करून दिली आहे. प्रभाग १९ मधील खाण परिसरातील मनपाने विहीर साफ करून नागरिकांना पाण्याची सोय करून दिली. तिथे मोटरपंप लावण्यात आले. पण येथील नागरिकांकडून या दुष्काळी परिस्थितीतही अतिरेक होत आहे. मोटर पंप चालू करून पाण्याचा मोठ्या धारेतच भांडे, कपडे धुण्यासह मुलांच्या अंघोळी केल्या जात आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. सोबतच काम झाल्यावर मोटर पंप बंद करण्याची तसदीही कुणी घेताना दिसत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाण्याच्या टंचाईने नागपूरकर बेजार आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे स्रोत कोरडे पडले आहे. त्यामुळे नियमित होणाऱ्या जलपुरवठा खंडित झाला आहे. काही भागात टँकरची सोय करण्यात आली आहे तर काही भागातील सार्वजनिक विहिरी मनपा प्रशासनाने स्वच्छ करून पाण्याची सोय करून दिली आहे. प्रभाग १९ मधील खाण परिसरातील मनपाने विहीर साफ करून नागरिकांना पाण्याची सोय करून दिली. तिथे मोटरपंप लावण्यात आले. पण येथील नागरिकांकडून या दुष्काळी परिस्थितीतही अतिरेक होत आहे. मोटर पंप चालू करून पाण्याचा मोठ्या धारेतच भांडे, कपडे धुण्यासह मुलांच्या अंघोळी केल्या जात आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. सोबतच काम झाल्यावर मोटर पंप बंद करण्याची तसदीही कुणी घेताना दिसत नाही.
नगरसेवकांनी घ्यावा पुढाकार
लोकमतचे परिसरातील वाचक असलेले संजय शिरपूरकर यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी या परिस्थितीचे छायाचित्र लोकमतला पाठविले. आता तरी संबंधित लोक बोध घेतील व पाण्याचा अपव्यय थांबवतील, अशी अपेक्षा आहे. या जनजागृतीसाठी स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे.