अपहरण-खुनाचा संपूर्ण घटनाक्रम सिद्ध

By admin | Published: January 31, 2016 03:09 AM2016-01-31T03:09:38+5:302016-01-31T03:09:38+5:30

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात युग चांडक या आठ वर्षीय मुलाच्या अपहरणापासून खुनापर्यंतचा घटनाक्रम सिद्ध झाला आहे.

The whole episode of abduction and murder is proven | अपहरण-खुनाचा संपूर्ण घटनाक्रम सिद्ध

अपहरण-खुनाचा संपूर्ण घटनाक्रम सिद्ध

Next

नागपूर : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात युग चांडक या आठ वर्षीय मुलाच्या अपहरणापासून खुनापर्यंतचा घटनाक्रम सिद्ध झाला आहे.
राजेश हा युगचा द्वेष करीत होता. त्याने दोन-तीनवेळा युगच्या कानशिलावर थापडा मारल्या होत्या. युग हा एकदा रडत असताना डॉ. चांडक यांना दिसताच त्यांनी राजेशला जबरदस्त फटकारले होते. राजेश हा क्लिनिकमध्ये आर्थिक घोटाळेही करीत होता. डॉ. चांडक यांनी मचाले नावाच्या एका रुग्णाच्या पैशाचा हिशेब विचारताच ८ आॅगस्ट २०१४ राजेशने कामावर येणे बंद केले होते. क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांनी साक्षीत ही बाब सांगितली होती. १ सप्टेंबर २०१४ रोजी अपहरणानंतर युगचा खून करण्यात आल्याची बाब सिद्ध झाली. युग चांडक राहत असलेल्या गुरुवंदना बिल्डिंगचा वॉचमन अरुण मेश्राम याने १ सप्टेंबर रोजी दुपारी ३.४५ ते ४ वाजताच्या दरम्यान लाल रंगाचा टी-शर्ट घातलेला अरविंद सिंग स्कूटीने येऊन युगला घेऊन गेल्याचे सांगितले होते. गुरुवंदना सोसायटी लकडगंज येथील इमारतीत बिहारलाल छाबडिया राहतात.
त्यांचे इतवारी मस्कासाथ येथे किराणा दुकान आहे. आपण जेवण करण्यास अ‍ॅक्टिव्हाने घरी आलो असता पार्किंगमध्ये आपल्या स्कोडा कारच्या मागे जांभळ्या रंगाची स्कूटी आणि तीवर लाल रंगाचा टी-शर्ट घातलेला अरविंद दिसला होता. आपल्याला पाहून त्याने तोंडाला रुमाल बांधलेला होता, असे साक्षीत सांगितले होते. गुरुवंदना बिल्डिंगजवळ जळाऊ लाकडाच्या विक्रीचा धंदा करणाऱ्या राजन तिवारी याने घटनेच्या दिवशी आरोपी राजेश दवारे आणि अरविंद सिंग हे दोघे युगला स्कूटीवर बसवून दानागंजच्या दिशेने घेऊन गेल्याचे सांगितले होते. राजेश आणि त्याचा मित्र अरविंद एका छोट्या मुलाला घेऊन स्कूटीने घरी आले होते आणि तडक ते त्याला मोटरसायकलने घेऊन गेले होते, असे राजेशच्या शेजारी राहणाऱ्या मामी रूपाली कनसरे यांनी न्यायालयात सांगितले होते. (प्रतिनिधी)

Web Title: The whole episode of abduction and murder is proven

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.